26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयअतूल सावेंच्या प्रयत्नाने ओबीसी विभागासाठी ३३७७ कोटींची तरतूद

अतूल सावेंच्या प्रयत्नाने ओबीसी विभागासाठी ३३७७ कोटींची तरतूद

राज्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. अनेक दिवसांपासून मराठा बांधव मोर्चे काढत आहेत. दरम्यान अशा स्थितीमध्ये मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी विभागासाठी ३३७७ कोट्यवधींची विक्रमी तरतूद आणली आहे. एवढी तरतूद आतापर्यंत कधीच आणली गेली नव्हती, अशी माहिती आता समोर येत आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांवर ३३७७ कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. आगामी वर्षात म्हणजेच २०२३ ते २०२४ मध्ये ओबीसी विभागासाठी योजनांची तरतूद ७ हजार ८७३ कोटी आणली आहे.

धनगर योजनांवर ५६ कोटींची तरतूद

ओबीसी विभागाच्या एका वर्षासाठी केलेली तरतूद ही विक्रमी तरतूद असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची तरतूद ही ३ हजार ८१ कोटीहून अधिक आहे. या निधीतून मोदी आवास योजना, महाज्योती योजना, मुक्त वसाहत योजना, यशवंतराव चव्हण योजनांसाठी काही रक्कम देण्यात येणार आहे. मोदी आवास योजनांसाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर महाज्योती योजनेसाठी २६९ कोटींएवढी तरतूद करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी १५८ कोटी तर धनगर समाजातील योजनांवर ५६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हे ही वाचा

रोहित पवारांनी सही केलेलं पत्र गेलं चोरीला?

लक्ष्मीकांत बेर्डेंचे भाऊ रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

धनगर आरक्षणाच्या मोर्च्याहून परतताना धनगर बांधवांचा मृत्यू

शैक्षणिक आणि सामूहिक विकास कामांसाठी हातभार

ओबीसी समाजातील दहावी शिक्षण घेणाऱ्या आणि दहावीआधीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ हजार ९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील मागासवर्गीयांना ३६० कोटी, ओबीसी आणि व्हीजेएनटीसाठी २० कोटी तरतूद केली असून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गात लाभार्थ्यांना शैक्षणिक आणि सामूहिक विकास कामांसाठी हातभार लागेल, असा विश्वास अतूल सावे यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी