38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने भाजपला मागे टाकले !

बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने भाजपला मागे टाकले !

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगर पंचायत निवडणूकांच्या बुधवारी हाती आलेल्या निकालानुसार सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA) आघाडीने प्रमुख विरोधी भाजपला मागे टाकले. एकूण 106 नगर पंचायतींसाठी निवडणूक झाली, त्यापैकी 93 नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपला 384, राष्ट्रवादीला 344 जागा, काँग्रेसला 316, शिवसेनेला 284 तर मनसेला 4 जागा मिळाल्या आहेत(Balasaheb Thorat said, Mahavikas Aghadi overtook BJP!).

पुढे विकासाची वाटचाल करण्याचा विचार

महाविकास आघाडीमधील काँग्रेसची भूमिका काय असणार आहे यावर राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले मत मांडले. नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश प्राप्त झाले आहे. आणखी पुढे विकासाची वाटचाल करण्याचा विचार आहे. महाविकास आघाडीसाठी हे मोठे यश आहे. स्वबळाच्या नाऱ्याचा थोडा फरक दिसेल पण यावेळी नवीन कार्यकर्तांना संधी मिळाली आणि ते जिंकूनही आले, काँग्रेस सगळीकडे दिसून येत आहे, प्रत्येकाला स्वतःच्या पक्षाची आवड असते.

विश्वजीत कदम, नाना पटोले यांच्यामुळे निवडणुकीत फटका मिळाला का असे विचारले असता ते म्हणाले की, महत्वाच्या निवडणूकीत अपेक्षेपेक्षा वेगळं घडतच असत त्यात विशेष काही नाही राज्यात सर्वत्र काँग्रेसचे नवीन नाव निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

महर्षी गणपतराव साठे जीवन गौरव पुरस्कार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांना जाहीर

काँग्रेसचा विचार हा देशाच्या प्रगतीचा आणि माणसाच्या उन्नतीचा आहे : बाळासाहेब थोरात

Maharashtra: Congress wins majority of Nagar Panchayat seats in Nanded, highest in Latur

नवीन चेहऱ्यानं यश मिळत आहे याचा फार आनंद वाटतो

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, नाना पाटोले त्यांच्या भागातील एका स्थानिक व्यक्तीला उद्देशुन बोलले. उगाच भारतीय जनता पक्षाने त्याचा मुद्दा बनवू नये. तसेच चंद्रकांत पाटील काही बोलतात त्याला काही महत्व नाही. भारतीय जनता पक्षाची अधोगती झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले म्हणून यश आहे असं नाही. काँग्रेस ला यश मिळालं आहे आणि नवीन चेहऱ्यानं यश मिळत आहे याचा फार आनंद वाटत आहे.

लवकरच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नवीन चेहरे दिसतील. तसेच धनशक्ती कोणाकडे आहे हे सगळ्या जनतेला माहितच आहे असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी