मुंबई आणि दिल्लीतील बीबीसीच्या (BBC) कार्यालयावर आयकर विभागाने धाड ताकत छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कार्यालयातील पत्रकारांचे फोन देखील ताब्यात घेण्यात आले असून, बीबीसी कार्यालयात येण्याजाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मध्यंतरीकाळात बीबीसीने गुजरात दंगलीवर आधारित एक डॉक्युमेंटरी देखील प्रदर्शित केली होती. ज्यात तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यानंतर कालांतराने याच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला होता. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे पाहता यामागे मोदींचाच हात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यावरून नवं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. (BBC offices Raids)
बीबीसीच्या कार्यालयावर झालेल्या या कारवाईनंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथील पत्रकारांचे फोन ताब्यात घेतले असून कोणतेही संपर्क करण्यास आणि येण्या-जाण्यास मज्जाव केला आहे. लंडनमधील बीबीसीच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप प्राप्तिकर विभागाकडून याबाबत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा इंटरनॅशनल टॅक्सशी संबंधित प्रकरण आहे. आयटीचं सर्चिंग बीबीसी कार्यालयात कर अनियमिततेबाबत सुरू आहे. दुसरीकडे, प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा छापा नसून छाप्याआधीचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे आता बीबीसी आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यामध्ये पुन्हा नव्यानं संघर्ष होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच बीबीसीने गुजरात दंगलीवर आधारित एक डॉक्युमेंटरी अर्थात माहितीपट प्रदर्शित केला होता. ज्यात गुजरात दंगलीवेळी तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. याशिवाय बीबीसीच्या दुसऱ्या भागातील माहितीपटात २०१४ नंतरच्या मॉब लिंचिंग आणि अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांचं चित्रण करत मोदी सरकारवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर बीबीसीच्या महितीपटाच्या आधारे भारतातील प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला होता. जेएनयू, जामिया, दिल्ली विद्यापीठ आणि मुंबईतील टीसमध्ये बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षही झाला होता. त्यामुळं आता बीबीसीच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळं त्यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे काँग्रेसने या कारवाईचा संबंध हा बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रींशी जोडला आहे. काँग्रेसने ट्विट करून म्हटले आहे की, ‘पहिले बीबीसीची डॉक्युमेंटरी आली. त्यावर बंदी घालण्यात आली आणि आता ITने बीबीसीवर छापे टाकले आहे. अघोषित आणीबाणी…’ असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.
पहले BBC की डॉक्यूमेंट्री आई, उसे बैन किया गया।
अब BBC पर IT का छापा पड़ गया है।
अघोषित आपातकाल
— Congress (@INCIndia) February 14, 2023
हे सुद्धा वाचा : बीबीसीच्या मोदींवरील डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगवरुन जेएनयूमध्ये गोंधळ
द मोदी क्वेश्चन : आयटी कायदा आणीबाणीतील अधिकार वापरुन केंद्राने बीबीसी डॉक्युमेंटरी केली ब्लॉक
मोदी सरकारवर जोरदार टीका
बीबीसी ही ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली काम करणारी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये बीबीसीचे कार्यालय असून इंग्लंडनंतर बीबीसीचं सर्वात मोठं कार्यालय हे राजधानी दिल्लीत आहे. हिंदी, मराठी, तामिळ, गुजरातीसह अनेक भाषांमध्ये बीसीसीनं विस्तार केलेला आहे. त्यामुळं आता बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर आयकर विभागानं छापेमारी केल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.