27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीय'मनोज जरांगेंना रोहित पवार आणि राजेश टोपेंनी बसवलं'?

‘मनोज जरांगेंना रोहित पवार आणि राजेश टोपेंनी बसवलं’?

राज्यात मराठा आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापलं आहे. मराठा समाज ओबीसी (OBC) प्रवर्गात सामावून घेण्यासाठी सरकारकडे मागणी करत आहे. मात्र सरकार यावर ठोस पाऊल उचलत नसल्याचा मराठा बांधवांचा दावा आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करून न देण्याचा दावा आता ओबीसी बांधवांचा आहे. यामुळे अंबड तालुक्यात ओबीसी समाजाने महाएल्गार सभेचे आयोजन केले. यासभेत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) काय बोलतील? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यांनी मनोज जरांगे-पाटलांवर (Manoj Jarange-patil) टीकेचे बाण सोडले आहेत. जरागेंनी याआधी भुजबळांना कोणाचं खातो, काणाचं खातो? असा सवाल केला होता. यावर अंबडच्या सभेत भुजबळ म्हणाले की, कोणाचं खातो, कोणाचं खोतो, पण तुझे खातो काय रे, तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.

अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. मराठा समाजाला प्रत्युत्तर म्हणून सभा घेतली आहे. यावेळी भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला आहे. मराठा समाजाने कोणत्या दगडाला शेंदूर फासटून देव तयार केला आहे. यांना अजून आरक्षण काय हे माहित नाही. आरक्षण म्हणजे काय ते माहिती करून घ्या. आरक्षण म्हणजे काय गरीबी हटावचा कार्यक्रम नाही, जरांगेंना आणून बसवण्याचे काम रोहित पवार आणि राजेश टोपेंचं असल्याचं म्हणत छगन भुजबळांची तोफ कडाडली आहे.

त्यानंतर अंबड येथे झालेल्या आंदोलनावेळी ७० पोलिसांवर हल्ले करण्यात आले नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला मात्र महाराष्ट्राला वेगळं चित्र दाखवण्यात आलं आहे. यावेळी होममिनिस्टरांचं मनोबल खचलं. यावेळी त्यांनी रोहित पवार आणि राजेश टोपेंवरही हल्ला केला आहे.

हे ही वाचा

‘माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका’; मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

‘धनगरांच्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा’; ‘यळकोट यळकोट, जय मल्हार…’

विराट कोहली इंस्टाग्राम पोस्टसाठी अक्षय कुमारहून घेतो अधिक पैसे?

रोहित पवार-टोपेंनी जरांगेंना आणून बसवलं

जालन्यात झालेल्या पोलिस लाठीचार्जवर जरांगे, रोहित पवार आणि राजेश टोपेंवर छगन भुजबळ बरसले आहेत. ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशी हे सरकार घरात जाऊन बसले. यावेळी टोपे साहेब आणि छोटो साहेब रोहित पवारांनी त्याला (जरांगेला) पहाटे तीन वाजता पवार साहेब येणार असल्याचं सागितलं. पण पवार साहेबांना लाठीचार्ज का झाला हे सांगितले नाही असा गौप्यस्फोट आता भुजबळांनी सभेत केला आहे. यानंतर त्यांनी गावबंदी हटवण्यावर वक्तव्य केलं

महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय का?

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर आम्ही गावबंदी हटवणार नसल्याचे जरांगे म्हणाले होते. यावर आता भुजबळ म्हणाले की, गावबंदी हटवणार नाही म्हणजे महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय का? हे कायद्याचे राज्य आहे की नाही हे कायद्याचे, सरकार आहे की नाही. गावबंदी हटवा, असे म्हणत छगन भुजबळांनी सभेच्या माध्यमातून जरांगेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावर आता जरांगे-पाटील काय प्रत्युत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी