31 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeराजकीय7 कोटी आले कुठून? भुजबळांचा जरांगे पाटलांना सवाल

7 कोटी आले कुठून? भुजबळांचा जरांगे पाटलांना सवाल

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचे वारे वाहत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या ते राज्यभरात सभा घेत असून त्यावरून राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी जरांगे-पाटील यांना छेडले आहे. सभांसाठी जरांगे-पाटील यांच्याकडे ७ कोटी रुपये आले कुठून, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीष महाजन, अजित पवार तसेच इतर काही नेत्यांनी उपोषणस्थळी जरांगेंची भेट घेतली होती. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र मिळावे, ही जरांगेंची मागणी आहे. उपोषण सोडताना जरागेंनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. त्याचवेळी ते आंदोलनावरही ठाम राहिले आहेत.

मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी आता ते राज्यभरात सभा घेत आहेत. रात्री-अपरात्री देखील होणाऱ्या त्यांच्या सभांना महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग उपस्थित राहात आहेत. अहमदनगरमध्ये झालेल्या सभेत जरांगे-पाटील यांनी, सरकार मराठा समाजाचा सरकार ओबीसींमध्ये समावेश करत नाही. कारण सरकारमध्ये काही ओबीसी नेते आहेत ज्यांचा ओबीसीत मराठा समाजाला सामावून घेण्यास विरोध आहे. जरांगे पाटील राज्यभरात सभा घेत असून त्याला प्रचंड खर्च येतो. हा खर्च अंदाजे ७ कोटींचा असून एवढे पैसे आले कुठून, असा सवाल छगन भुजबळांनी जरांगे-पाटील यांना विचारला आहे.

हेही वाचा 

टोलमुद्यावरून राज ठाकरे, दादा भुसे यांची पत्रकार परिषद.. राज्य सरकारचे मोठे निर्णय

भुजबळ खोटे बोलून शपथविधीला गेले, शरद पवारांचा पलटवार

शुभमन गिल पाकिस्तानविरोधात मैदानात?

काय म्हणाले छगन भुजबळ?

मनोज जरांगे-पाटील राज्यात मराठा समाजाच्या सभा घेत आहेत. एवढ्या सभा घेण्यासाठी त्यांच्याकडे निधी कुठून आला?असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. सभेसाठी 100 एकराचे शेत साफ करण्यासाठी 7 कोटींचा निधी कुठून आला? असा भुजबळांचा सवाल आहे. आरक्षण मिळाले म्हणजे आपण श्रीमंत झालो असे नाही. अजूनही काही लोक झोपडपट्टीत राहतात त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे.

मराठा आरक्षणात मिठाचा खडा टाकू नये

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे पाटलांनी उपोषण करत असताना केली होती. यातून मार्ग काढण्यासाठी महिन्याभरात सरकारकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. मराठ्यांना आरक्षण द्या, पण ओबीसीच्या कोट्यातून नको, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणात कुणीही वाटेकरी नको, यासाठी ओबीसी नेत्यांनी राज्यभर आंदोलने केली आहेत. यातूनच मनोज जरांगेंनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. जरांगे म्हणाले, आमच्याकडे मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याची कागदपत्रे आहेत. यात मिठाचा खडा टाकू नये, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी