30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयबंगळुरुत छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना, कोल्हापूर, बेळगावमधील शिवप्रेमी संतापले!

बंगळुरुत छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना, कोल्हापूर, बेळगावमधील शिवप्रेमी संतापले!

टीम लय भारी

कोल्हापूर : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींचा संताप अनावर झाला आहे. शिवप्रेमींनी कानडी व्यवसायिकांना दुकान बंद करायला भाग पाडले आहे(Chhatrapati Shivaji Maharaj: Defacement of Bangalore statue)

कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. शिवप्रेमी कडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

Happy Birthday Richa Chadda | ‘नगमा खातून’ तर कधी ‘भोली पंजाबन’ बनून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, वाचा अभिनेत्री रिचा चड्ढाबद्दल…

20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा नाही?; अनिल परब नेमकं काय म्हणाले?

बेळगावतल्या कृत्याचे कोल्हापुरात पडसाद

 विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकतील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना केली, त्याचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच तापले आहेत. कोल्हापुरातील वातावरण सध्या तणावाचे आहे.

बेळगावात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले

फक्त कोल्हापुरातच नाही तर बेळगावतही अनेकजण आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले, महाराष्ट्र एकिकरण समिती रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले, यावेळी त्यांनी कर्नाटकचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ओबीसींची जनगणनाच झाली नाही, केंद्राचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; भुजबळांचा दावा

NEWS HOME » INDIA 27 held for attacking Sangolli Rayanna statue in Karnataka’s Belagavi

त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ही विकृती असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर याबाबत सरकारने हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारशी बोलणी करावी असेही ते म्हणाले आहेत. बेळगावातही लोकांनी कानडी लोकांची दुकाने बंद केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे. त्यानंतर बेळगावमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावला सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी