26 C
Mumbai
Tuesday, September 24, 2024
Homeराजकीयनागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

टीम लय भारी

नागपूर :-  आज राज्यभर भाजपाचा चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सर्व भाजप नेते सहभागी झाले आहेत. नागपूर येथे आंदोलन सुरू असतांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे (Devendra Fadnavis has been arrested by the police). आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले तरी आंदोलन सुरू राहील.

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी राज्यात भाजपाचे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू असतांना देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर भाजपाने आपल्या महाराष्ट्र भाजपा या ट्विटवर अकाउंटवर ट्विट केले आहे. यात ते म्हणाले आहेत. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अशा अटकेने जनतेचा हा आक्रोश दाबता येईल असे ठाकरे सरकारने समजू नये. ओबीसींना त्यांचा हक्क मिळेपर्यंत हा लढा निरंतर चालू राहील. #OBCvirodhiMVA असा हॅशटॅग लावत हे ट्विट केले आहे.

Devendra Fadnavis was arrested by the police in Nagpur
नागपुरातील चक्काजाम आंदोलन

भाजपच्या आंदोलनावर अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर यांचे टीकास्त्र

कोरोना मेला, जनता बेफिकीर, पुढारी मोकाट

 

Devendra Fadnavis was arrested by the police in Nagpur
देवेंद्र फडणवीस

राज्यात चक्काजाम आंदोलन हे शांतपणे सुरू असतांना. देवेंद्र फडणवीस यांना आणि इतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेर केला आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पोलीस घेऊन जात आहेत,  तेव्हा त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन जात आहेत (While Devendra Fadnavis is being taken away by the police, some activists are being taken away by the police). इतर कार्यकर्ते याला विरोध करताना यात दिसून येत आहे.

‘कोरोना’ची नवी डोकेदुखी, डेल्टा प्लस हातपाय पसरतोय

Jitendra Awhad visits Devendra Fadnavis, BJP says housing project for cops discussed

Devendra Fadnavis was arrested by the police in Nagpur
ओबीसी चक्काजाम आंदोलन

मात्र, आम्ही यामुळे थांबणार नाहीत. हे आंदोलन असेच सुरू राहील. राज्य सरकार तुमच्या हातात आहे. ठाकरे सरकारच्या आदेशानुसार पोलिस सर्वांना ताब्यात घेत आहेत. पण भाजप माघार घेणार नाही ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा निरंतर चालू राहील असे भाजप म्हणत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी