31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयशिंदे गटाच्या मेळाव्यात आलेल्या दोन एसटी बसला ट्रकची जोरदार धडक; २५ कार्यकर्ते...

शिंदे गटाच्या मेळाव्यात आलेल्या दोन एसटी बसला ट्रकची जोरदार धडक; २५ कार्यकर्ते जखमी

राज्यात काल (२४ ऑक्टोबर) या दिवशी मुंबई येथे २ दसरा मेळावे पार पडले. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर झाला. तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही सभांना चांगलीच गर्दी झाली होती. शिंदे गटाची सभा संपल्यानंतर राज्यातून अनेक बस भरुण आल्या होत्या. त्यापैकी काही लोकं मराठवाड्यातून आली होती. तर शिंदे गटाचे दादासाहेब भुसेंनी असंख्य लोकं सभेसाठी आणली गेली होती. दरम्यान, रात्री परतीच्या प्रवासाला शहापूरकडे जात असताना कळंभे गावाजवळ २ बसचा अपघात झाला. यात शिंदे गटाच्या २५ कार्यकर्त्यांचा अपघात झाला आहे.

रात्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा संपल्यानंतर रात्री असंख्य लोकं परतीच्या प्रवासाकडे वाटचाल करू लागले. नाशिक महामार्गावरून शहापूरकडे जात असताना प्रवाशांचा बस अपघात झाला. यावेळी मागून एक ट्रक आला आणि त्या ट्रकने बसला ठोकर दिली. यावेळी दोन बस आदळल्या त्यातील एक बस ही रस्त्यावरील डीव्हायडर तोडून आदळली. हा अपघात शहापूरला जात असताना कळंभे गावाजवळ झाला आहे. या अपघाताने वाहतुककोंडी झाली होती. यामुळे इतर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. दुखापतग्रस्तांना शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घडलेल्या दुर्घटनेवर मुंबई पोलिस निरीक्षकांनी याबाबत माहीती दिली आहे.

हे ही वाचा

दसऱ्याला झाली तब्बल 650 किलो सोन्याची खरेदी!

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मिळणार लाभ

आलिया, रणबीरची मुलगी बोलू लागली… रणबीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

काय म्हणाले पोलिस निरीक्षक?

दसरा मेळाव्यानंतर विविध ठिकाणाहून लोकं आली होती. आपल्या घराकडे जाण्यासाठी लोकांनी रात्रीचे जेवण झाल्यानंतर परतीची वाट धरली होती. यावेळी कैक बस होत्या, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास परतीच्या प्रवासात हा अपघात कळंभे गावाजवळ झाला. यावेळी वाहतुककोंडी झाल्याने प्रवासासाठी अडथळे निर्माण झाले होते. दुखापतग्रस्तांवर शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातांची पोलिस ठाण्यात दखल घेण्यात आली असल्याची माहीती मुंबई पोलिस निरीक्षक अनंत पराडकरांनी दिली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी