32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमनोरंजनआलिया, रणबीरची मुलगी बोलू लागली... रणबीरने दिली 'ही' प्रतिक्रिया!

आलिया, रणबीरची मुलगी बोलू लागली… रणबीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरची मुलगी राहा येत्या नोव्हेंबर महिन्यात एका वर्षाची होत आहे. अकरा महिन्यांची राहा आता एकएक शब्द बोलू लागलीये. आपल्या मुलीच्या संगोपनासाठी सध्या मोठ्या काळासाठी ब्रेकवर असलेल्या रणबीर कपूरनेच ही माहिती दिली.

एरव्ही मीडियापासून दूर राहणारा रणबीर कपूर गेल्या काही महिन्यांपासून थेट चाहत्यांशी संपर्कात राहणं पसंत करतोय. रणबीर कपूर सोशल मीडियापासून दूर आहे. झूम या सोशल मीडियावर खासगी चाहत्यांशी रणबीर कपूरने थेट संवाद साधला. रणबीर कपूर आपल्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांशी दिलखुलासपणे बोलत होता. मी सहा महिन्यांसाठी ब्रेकवर आहे. मी घरी राहाच्या संगोपनासाठी घरी थांबण्याचं ठरवलंय. हा निर्णय मी जाणीवपूर्वक घेतल्याचंही त्यानं सांगितलं.
रणबीर म्हणाला, “राहाच्या जन्मानंतर मला तिला फार वेळ देता नाही आला. त्यावेळी मी ‘एनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी व्यस्त होतो. आता आलिया नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे म्हणून मी राहासाठी घरी थांबण्याचा निर्णय घेतला.”

रणबीरचा एनिमल चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हा सिनेमा येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. दोन आठवड्यापूर्वी रणबीरच्या ‘हुआ मै’ गाणे प्रदर्शित झाले. गाण्याला नेटीझन्सनी चांगलीच प्रशंसा केली. रणबीर आणि आलियाचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मस्त्र’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा झाली आहे.

याबद्दल माहिती देताना रणबीर म्हणाला, “सध्या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक ‘वॉर 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या शूटिंगला पुढच्या वर्षी मे महिन्यात सुरुवात होईल. काही कारणास्तव विलंब झाल्यास शूटिंग थेट 2025 साली सुरु होईल.”

हे ही वाचा

मलायका आणि अर्जुनचं पुन्हा ब्रेकअप?

पिक्चर सलमानचा चर्चा इम्रान हाश्मीची!

करीनाच्या ‘द बकिंगहॅम मडर्स’ची चर्चा, लवकरच झळकणार ‘मामी’मध्ये!

रणबीर नोव्हेंबर महिन्यात काही काळ ‘एनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त राहील. राहा सध्या चालण्यासाठी डोळ्यासमोर दिसणाऱ्या व्यक्तीला पकडून उभा राहण्याचा प्रयत्न करतेय. ती जमिनीवर वेगाने सरपटत मला मिठी मारायला येते. तिला मोठं होताना पाहणं मला जास्त महत्वाचं वाटतं असं सांगत भावनिक झालेल्या रणबीरला चाहत्यांनी ऑनलाईन संवादाच्या माध्यमातून आधार दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी