26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयमनोज मौनिक हे एकनाथ शिंदेंचे नवनिर्वाचित 'प्रधान सल्लागार'

मनोज मौनिक हे एकनाथ शिंदेंचे नवनिर्वाचित ‘प्रधान सल्लागार’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (९ जानेवारी) दिवशी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. मनोज सौनिक हे ३१ डिसेंबर २०२३ रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागी नितीन करीर म्हणून नियुक्ती करण्यात आली. गेल्या वर्षी मनोज सौनिक यांनी ४६ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्विकारला. पदभार स्विकारलेला कार्यकाळ हा ३० एप्रिल ते ३१ डिसेंबर असा आठ महिन्यांचा होता. ३१ डिसेंबर २०२३ दिवशी निवृत्त होत असताना त्यांना मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करत अर्ज पाठवला. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला नाही. १९८८ च्या बॅचचे सनदी अधिकरी नितीन करीर यांची १ जानेवारी २०२४ मध्ये मुख्य सचिवपदी नियुक्ती आले.

मनोज सौनिक यांना मुदतवाढ हवी होती. मात्र केंद्र सरकारने ती नामंजूर केली. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी सौनिक यांची कार्यालयातील प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्य सचिवपदी नियुक्ती होण्याआधी मनोज यांच्यावर वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी होती. विशेष म्हणजे मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर सरकारने त्यांच्याकडे या दोन्ही पदांचा कार्यभार सोपवण्यात आला. त्यांनी केलेल्या कामाचा आणि अनुभवाचा तसेच त्या त्या क्षेत्रातील संपर्काचा फायदा एकनाथ शिंदे यांना होईल.

हे ही वाचा

ना हिंदू ना मुस्लिम आयरा आणि नुपूर शिखरेनं केलं ख्रिश्चन पद्धतीनं लग्न

‘खरी शिवसेना शिंदेंचीच’, मुख्यमंत्रीपद वाचलं, १६ आमदार पात्र ठरल्याने जीवनदान

वसिम अक्रमच्या पत्नीला एका चाहत्याने हॉट अशी केली कमेंट, अक्रमचा पारा चढला

निवृत्त मुख्य सचिवांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी निवड यापूर्वी होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात अजोय मेहता आणि सिताराम कुंटे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सत्तांतर झालं आणि हे दोन्ही अधिकार केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले. १९८८ मध्ये अजोय मेहता यांच्या नरिमन पॉईंटमधील फ्लॅटवर टाच आणली. अनिल देशमुख यांच्या मनी लॉंड्रिंग आणि पोलिसांच्या बदल्या प्रकरणात ईडीकडून सीताराम कुंटे यांची चौकशी करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी