27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयधर्मरावबाबा आत्रामांच्या निर्देशाने मुंबई आणि नवी मुंबईत गुटखा विक्रीवर चाप

धर्मरावबाबा आत्रामांच्या निर्देशाने मुंबई आणि नवी मुंबईत गुटखा विक्रीवर चाप

राज्यात खुले आम गुटखा विक्री सुरू आहे. गेली अनेक दिवसांपासून अन्न व औषध प्रसाधनाने (Food And Drugs Administration) गुटखा विक्री (TOBACOO) आणि पान मसाल्याची अवैध्य विक्री करणाऱ्यांना चांगला हिसका दाखवला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम (Dharmaravbaba Aatram) यांच्या निर्देशनानुसार मुंबईतील बोरिवली, परळ, दादर, जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड पश्चिम येथे अवैध्य विक्री होत असून त्यांच्यावर कारवाई करत १ लाख ७ हजार ४२० रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केला. याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आले आहे. मुंबईमध्ये गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून अन्न व औषध प्रसाधनाकडे येत होत्या. मात्र आता अन्न व औषध प्रसाधनाने यावर चाप बसवण्याचे काम केलं आहे.

अनेक दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडे गुटखा आणि पान मसाला विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे आता मुंबई आणि नवी मुंबईत एफडीएने धडक घातली आहे. जोगेश्वरी पश्चिम येथे ८१ हजार रूपयांचा गुटखा जप्त केला होता. बोरीवलीच्या पश्चिमेकडील भागात ९ हजार १९६ रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. यावेळी सुगंधित पान आणि मसाला पान दोन्ही जप्त करण्यात आले होते.

हे ही वाचा

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात ३०० रूपयांसाठी मुलाला निर्वस्त्र मारहाण

‘कोणाची जमीन खाल्ली, बंगले हाडपले, मला शांत राहू दे…’ मनोज जरांगेंचा भुजबळांवर एकेरी उल्लेख

‘खेळाडू राजकीय नेत्यांहून अधिक शिस्तप्रिय’

परळ एसटी आगारजवळील दुबे पान शॉप आणि दादर येथील बीएस रोडवरील किरण पान बिडी शॉप येथील पान मसाला, सुंगधित तंबाखु आणि गुटखा जप्त करण्यात आला असून हा गुटखा ९ हजार १४२ रुपये किंमतीचा होता. या दोन्ही दुकानांच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मुलुंड येथील महाकाली, साई आणि शिव पान शॉप, साची पान शॉप, रानु उपाध्याय पान बिडी शॉप आणि राजेश जेठालाल या पान शॉपवर कारवाई करण्यात आली आहे. ८ हजार रूपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखु जप्त करण्यात आली आहे.

नवी मुंबईत गुटखा विक्रीवर चाप

आता मुंबईच नाही तर नवी मुंबईतही एफडीएने अवैध्य गुटखा विक्रीवर चाप बसवण्याचे काम केले आहे. नवी मुंबई वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये गुटखा विक्री सुरू आहे. या ठिकाणी गुटखा, पान मसाला आणि तंबाखुजन्य पदार्ध सापडले असून जप्त करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या टपऱ्यांना सिल लावण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी