33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हकालपट्टी

ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हकालपट्टी

टीम लय भारी

ठाणे : महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाची परिस्थिती दयनीय झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये, असेच दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. अशातच, ठाण्याच्या माजी महिला महापौर आणि एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक मीनाक्षी शिंदे यांची शिवसेना पक्षातून हक्कलपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शक्ती प्रदर्शन केले. यामध्ये माजी महिला महापौर मीनाक्षी शिंदे यांचा देखील सहभाग होता. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला समर्थन दिले त्यामुळे शिवसेना पक्षाकडून त्यांची पक्षातून आणि ठाणे जिल्हासंघटक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, मीनाक्षी शिंदे यांनी आज ठाण्यातील सर्व महिलांना ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात शक्ती प्रदर्शन करण्याचे आवाहन केले होते. मीनाक्षी शिंदे या शिवसेनेकडून चार वेळा नगरसेवक म्हणून विजयी होऊन आलेल्या आहेत. ठाण्यामध्ये पक्षवाढीसाठी मीनाक्षी शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु आता एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांच्या पक्षविरोधी कारवाया वाढल्याने पक्षाकडून त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदे संतापले, उद्धव ठाकरेंना आव्हान दिले !

बंडखोर आमदाराकडून मुंबईतील इमारत दुर्घनाग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर !

‘भाजपा लबाड, मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्यांना फोन केलेला नाही’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी