28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही'

‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही’

राज्यात काही महिन्यांपासून मराठा समाज ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी सरकारकडे मागणी करत आहे. यामुळे अनेक मराठा आंदोलकांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं अवघड असल्याच्या चर्चा आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे आंदोलन आणि मोर्चे काढण्यापासून थांबायचं नाव घेत नाहीत. त्यांनी दोन वेळा उपोषण केलं. तर सध्या त्यांचे महाराष्ट्र दौरे सुरूच आहेत. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली आहे. मात्र यावर आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे आणखी वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?

मराठा समाजाच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल, असंही महाजन म्हणाले आहेत. यामुळे अधिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर मनोज जरांगे-पाटील काय प्रतिक्रिया देतील. याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा

‘राजेश टोपेंच्या गाडीवर केलेला हल्ला म्हणजे भाजपचा रडीचा डाव’

राजेश टोपेंच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

संघर्ष केला नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवार खपवून घेणार नाहीत

मनोज जरांगेंना महाजन अनेकदा भेटायला गेले होते. त्यावेळी महाजनांनी जरांगेंना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. कुणबी जातप्रमाणपत्राच्या नोंदी असेल तरच त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. दरम्यान, हे जातप्रमाणपत्र कशा पद्धतीनं? कोणत्या नियमाने? कोणत्या कायद्यानुसार देण्यात येईल? हा देखील मोठा प्रश्न असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत. अशातच आता महाजन आणि जरांगे-पाटील यांच्यात बिनसलंय का? असे अनेकदा विचारण्यात आले आहे. मात्र तसं काही नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

मनोज जरांगे-पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात नाराजी असल्याची अनेकदा चर्चा होत आहे. मात्र तसं काही नसल्याची बाब गिरीश महाजनांनी व्यक्त केली आहे. कारण याआधी चार वेळा जरांगेंना भेटून आलो, मात्र पाचव्यांदा मी बाहेर गावी असल्याने मला भेटता आले नाही, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी