25 C
Mumbai
Wednesday, February 14, 2024
Homeराजकीयसंघर्ष केला नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवार खपवून घेणार नाहीत

संघर्ष केला नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवार खपवून घेणार नाहीत

देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून आहेत. भाजपला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निवडून द्यायचं आहे. यासाठी महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. यामुळे आता रोहित पवारांनी देखील युवा संघर्ष यात्रेतून तरूणांचे प्रश्न सरकार पुढे मांडण्यासाठी पायपीट करत युवा संघर्ष यात्रेच्या माध्यामातून आपले कार्य सुरू ठेवले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जतच्या शिबिरात (१ डिसेंबर) दिवशी रोहित पवारांवर कसला संघर्ष चालु आहे?,अशी टीका केली. यावर रोहित पवारांनी जशास तसं उत्तर देत आपण माझ्यावर टीका करा, टीका मी पचवून घेईल, परंतु युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही, असं वक्तव्य करत संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही २४ ऑक्टोंबरपासून पुण्यात सुरू झाली होती. यासाठी शरद पवारांच्या हस्ते युवा संघर्ष यात्रेचे उद्घाटन करण्यात आले होते. युवा संघर्ष यात्रेचा आखेरचा टप्पा हा ८०० किमीचा असणार आहे. तर आतापर्यंत या संघर्ष यात्रेचा टप्पा हा ५०० किमीपर्यंत झाला आहे. दरम्यान अजित पवारांनी रोहित पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा

‘नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करा’

‘तुम्ही पवार नसता तर बारामतीत निवडून आला असता का’?

‘वंशाचा दिवा मुलीच लावतात’

काय म्हणाले रोहित पवार?

ट्विट करत रोहित पवार म्हणाले की, युवांच्या मागण्यासाठी आम्ही सर्व पुणे ते नागपूर असा ८०० किमीचा पायी प्रवास करत आहोत. आतापर्यंत ५०० किमीपर्यंतचा प्रवास झाला आहे. हा संघर्ष आपल्या नजरेत फार लहान आहे. मात्र युवांच्या भविष्यासाठी निगडीत असून भविष्यातही संघर्ष करण्याची आमची तयारी आहे.

युवासंघर्ष यात्रेला युवांच्या प्रश्नासाठी घेऊन चाललेल्या संघर्ष यात्रेकडे आपले राजकीय टीकेसाठी का होईना लक्ष गेलं आहे. तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्याकडेही लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा खपवून घेतलं जाईल. मात्र युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास खपवून घेतलं जाणार नसल्याचे जशास तसं उत्तर रोहित पवारांनी दिलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी