27 C
Mumbai
Saturday, March 2, 2024
Homeराजकीय'राजेश टोपेंच्या गाडीवर केलेला हल्ला म्हणजे भाजपचा रडीचा डाव'

‘राजेश टोपेंच्या गाडीवर केलेला हल्ला म्हणजे भाजपचा रडीचा डाव’

देशात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यातील वातावरण निवडणुकांपूर्वीच तापलं आहे. राजकीय मतभेदाचा हिसका राजकीय नेते कसे? कुठे? आणि कशाप्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. दरम्यान, (२ डिसेंबर) दिवशी राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपेंच्या गाडीवर हल्ला केला. हा हल्ला जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या समोर झाला आहे. हल्ला करणारे मराठा आंदोलक असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे, मात्र अजून हे कितपत खरं आहे, हे माहिती नाही. यावर आता राज्यभरातून नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी हल्ल्याबाबत भाजपवर रोष व्यक्त केला आहे.

(२ डिसेंबर) दिवशी जालन्यात मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक होती. यावेळी राजेश टोपे मध्यवर्ती बॅंकेत उपस्थित असता, त्यांच्या गाडीवर दगड, लाकडाने हल्ला करण्यात आला, यावेळी त्या ठिकाणी एक तेलाची बाटली देखील होती. यावरून आता वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. हल्ला होण्याच्या वेळेस त्या ठिकाणी टोपेंचा ड्रायव्हर गाडीतच बसला होता. यामागे नेमकं राजकारण म्हणावं की आणखी काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

हे ही वाचा

राजेश टोपेंच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

‘मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चार लाख बेरोजगारांची नोंद’

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार की आणखी कोण?

टोपेंची गाडी बॅंकेच्यासमोर पार्कींग करण्यात आली होती. गाडीजवळ टोपेंचा ड्रायव्हर उपस्थित होता. यामागे हा हल्ला राजकीय सूडबुद्धीने केलेला हल्ला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता रोहितच पवारांनी भाजपवर रोष व्यक्त करत भाजपने राजेश टोपेंच्या गाडीवर हल्ला करत रडीचा डाव खेळला असल्याचं ट्विट शेअर करत भाजपवर निशाणा साधला असून निषेध केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

सहकार क्षेत्र हे नेहमी राजकारणापासून दूर ठेवण्याची गरज आहे, मात्र प्रत्येक ठिकाणीच राजकारण करणाऱ्या भाजपच्या अतृप्त आत्म्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे साहेब यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा रडीचा डाव खेळला.. या कृत्याचा तीव्र धिक्कार आणि निषेध!, असे ट्विट करत रोहित पवारांनी भाजपचे कान टोचले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी