27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीय'रश्मिका मंदान्नापेक्षा माझी आजी पाणी कम चाय...'

‘रश्मिका मंदान्नापेक्षा माझी आजी पाणी कम चाय…’

ॲड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavrte) नेहमीच कोणत्या न् कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात. गेली काही दिवसांपासून ते मराठा आरक्षणावर बोलत आहेत. तर याआधी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकालेल्या संपामध्ये एसटी आंदोलकांवर टीका केल्या होत्या. तर मराठा आरक्षणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा हात असल्याचं वक्तव्य सदावर्ते यांनी केलं होतं. अशातच आता सदावर्ते एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. एबीपी माझाच्या झालेल्या मुलाखतीत सदावर्तेंनी आपल्या समाजकारणाबाबत इतर कार्याबाबत आणि वैयक्तिक जीवनाबद्दल सांगितलं. यामध्ये त्यांनी आपल्या अजीचा किस्सा सांगितला. आपल्या अजीची तुलना थेट अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika mandanna) केली आहे.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी मुलाखत देत असताना त्यांनी आपल्या वैयक्तिक सामाजिक जीवनाबद्दल सांगितलं. यामध्ये त्यांनी आपल्या आजीची तुलना रश्मिका मंदान्नासोबत केली. ते म्हणाले की, माझी आजी रश्मिका मंदान्नापेक्षा सुंदर होती. उंच ६ फूट, एखाद्या रशियन मुलीप्रमाणे रश्मिका मंदान्ना पाणी कम चाय, फेस व्ही कट असे वर्णन करत गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या आजीच्या सौंदर्याची बरोबरी रश्मिका मंदान्नासोबत केली आहे. त्यासोबत त्यांनी त्यांच्या आजीच्या आणि स्वतःच्या नात्यातील काही किस्से सांगितले.

हे ही वाचा

‘मराठा समाजाला आरक्षण द्या’; जरांगेंसोबत आंदोलनाच्या रिंगणात बच्चू कडू

वर्ध्यातील ओबीसी एल्गार सभेचा फज्जा; सर्व खुर्च्या रिकाम्याच

मराठा आरक्षणाला शरद पवारांचा विरोध – देवेंद्र फडणवीस

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि शिक्षण

घरात गुन्हेगारीची पार्श्वभूमी आणि आपल्या वैयक्तिक शिक्षणाबाबत सदावर्तेंनी सांगितलं. ते म्हणाले की, घरात सर्वच गुन्हेगार होते. यामुळे घरच्यांना मी शिकावं असं वाटत असायचं. माझ्या वडिलांना शेवटचा दरोडा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घरी टाकायचा होता अशी आठवण त्यांनी सांगितली. तर माझ्या आईला मी डॉक्टर व्हावं असं वाटायचं. माझ्या आजीला आणि वडिलांना मी वकील व्हावं असं वाटायचं. कारण वकिलांना अधिक मान असतो. असं म्हणत त्यांनी आपले वैयक्तिक शिक्षण आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल किस्सा सांगितला.

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. मराठा समाज कसा मागास आहे. मराठा आरक्षणाला कशा प्रकारे आरक्षणासाठी समस्या उभ्या राहतील याबाबत माहिती गुणरत्न सदावर्तेंनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी