28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करा'

‘नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करा’

राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी भाजपने ईडी, सीबीआयचा वापर करत राज्यातील पक्ष फोडण्याचं काम केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँगेस आणि शिवसेना पक्षात दोन गट पडले आहेत. राज्याचे राजकारण इथपर्यंत बरं होतं, मात्र आता ते अगदी कौटुंबिक नात्यांपर्यंत गेलं आहे. कर्जत येथे झालेल्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वंशाचा दिवा फक्त मुलीच लावतात, असं वक्तव्य केलं होतं, यामुळे राजकारणाला वेगळं वळण लागलं आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना सुनावले. दरम्यान शिवसेना फूटीनंतर अजित पवारांनी शिंदे गटाविरोधात भाषण केलं असून तुमच्यात धमक होती तर पक्ष काढा ना असे वक्तव्य केलं होतं, यावर आव्हाडांनी भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड करत भाजपशी युती करत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री पद मिळवले. शिंदे आणि फडणवीस सरकारला एक वर्ष होऊनही गेलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात मतदार आणि राजकीय क्षेत्रात असंतोष होता. लोकशाहीचा अवमान होत असल्याच्या चर्चा देखील होत्या. यावर अजित पवारांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटावर एका भाषणात हल्ला चढवला होता. हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा असे वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं.

काय म्हणाले अजित पवार?

जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत अजित पवारांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला केला होता. निवडणूक आयोगाने जरी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय दिला असला तरीही खरं काय ते लोकांना माहित आहे. ज्यांच्या वडिलांनी शिवसेना पक्ष उभारला त्यांचाच पक्ष चोरता, चिन्हं चोरता, असे वक्तव्य अजित पवारांनी केलं.

हे ही वाचा

‘तुम्ही पवार नसता तर बारामतीत निवडून आला असता का’?

‘वंशाचा दिवा मुलीच लावतात’

राज्यातील ‘या’ ठिकाणी अजित पवार गट जागा लढवणार

दरम्यान, सध्या अजित पवार हेच शिंदे गट आणि भाजपसोबत आहेत. यावर आव्हाडांनी ट्विट करत अजित पवारांनीच स्वतःचा पक्ष काढा, चिन्हंही निवडा आणि स्वतःची ओळख सिद्ध करा अशी खोचक टीका केली. आव्हाड म्हणाले की, दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी ! शिवसेना फूटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल.

नवीन निशाणी घ्या आणि स्वत:चं कर्तुत्व सिद्ध करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिला, त्याचं पालन पोषण ही पवार साहेबांनी केलं, संगोपन पुढे पवार साहेबांनीच केलं. राष्ट्रवादी पक्ष वाढला हा देखिल पवार साहेबांमुळेच आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात. मग, जसं आपण म्हटलात तसं घ्याना आणि एक नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वत:चं कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी