26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयआंबेडकरवादी नेते जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे यांच्या कळपात; आता महाराष्ट्रभर घेणार सभा

आंबेडकरवादी नेते जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे यांच्या कळपात; आता महाराष्ट्रभर घेणार सभा

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती केली. गेली कित्तेक वर्षे कवाडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील ते मविआसोबत होते. मध्यंतरी मविआचे सरकार कोसळल्यानंतर आता जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती केली आहे. आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेले जोगेंद्र कवाडे यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती केली. (Jogendra Kawade alliance with Eknath Shinde)

मुंबईत बुधवारी (दि. ४) पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीची घोषणा केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज जोगेंद्र कवाडे आणि बाळासाहेबांची शिवसेना यापक्षावरोबर पिपल्स रिपब्लिकन पार्टीने आज युती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मी स्वागत करतो. जेव्हा सरकार बदलले तेव्हा पासून त्यांच्या कार्यकर्त्यानी भावना बोलून दाखवली होती. आमची त्यांची पूर्वीपासूनची ओळख आहे. तुमचा आणि आमचा पक्ष संघर्षातून पुढे आलेला आहे. तो संघर्ष साधा नव्हता. तर क्रांती होती. त्यांनी चळवळीच्या काळात आक्रमकपणे लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. ते तुरुगांत गेले. त्यांच्या भाषणांना २० जिल्ह्यात बंदी होती. त्यांची आक्रमकता भल्या भल्यांना घाम फोडत होती. ओबीसीच्या प्रश्नावर ते तिहार जेलमध्ये होते. बाळासाहेबांचा देखील तोच विचार होता. आम्ही देखील लाठ्या काठ्या खाल्ल्या. लोकांच्या प्रश्नाला न्याय देणारे दोन्ही पक्ष आहेत.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात विश्व मराठी साहित्य संमेलन; पण ठाकरेंना निमंत्रणच नाही!

शरद पवार म्हणाले, माझ्यासमोर संभाजी महाराजांबद्दल दोन पद्धतींचे लिखाण

गुजराती वरवंटा : महाराष्ट्रातील दोन लोकप्रतिनिधींचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार, निमंत्रण पत्रिका मात्र गुजरातीमध्ये !

यावेळी बोलताना जोगेंद्र कवाडे म्हणाले, आघाडीची घोषणा करताना आनंद होत आहे. शिव, शाहु, फुले, प्रबोधनकार, आंबेडकर हा आमचा मुख्य उद्देश आहे. गोरगरींबांच्या हक्कासाठी पिपल्स रिपब्लिकन त्यांच्यासोबत आघाडी करत आहे. काल ते नायगावला गेले होते. भिडे वाड्याच्या पुनरुज्जिवनाची भूमिका त्यांनी मांडली. या सर्व वातावरणात आम्ही एकत्र येत आहोत.

राज्यभरात घेणार सभा; उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर आरोप

जोगेंद्र कवाडे म्हणाले, राज्यातील पाच विभागात सभा घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी नागपूर येथे शिंदे यांना भेटलो. नागपूरच्या अंबासरी उद्यानात चार कोटी खर्चून आंबेडकर भवन उभारले होते. मविआ काळात त्या स्मारकाची जागा पर्यटन विभागाला दिली. तेथील स्मारकाचे पाडकाम केलेय त्यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे होते. त्यावेळी आंदोलन केले. ५० हजारांचा मोर्चा काढला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अनके निवेदने दिली मात्र काही कारवाई केली नाही. आम्ही काल परवा शिंदे यांना निवेदन दिले. त्यांनी सकारात्मकता दाखवली. तसेच भवन तोडलेच कसे असा सवाल देखील केला. राज्यात गायरान जमीनींचा प्रश्न आहे, त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला. इंदु मिल आंदोलन झाले. त्यावेळी तेथे  कोणाला जायची इच्छा झाली नाही. पण शिंदे यांनी त्याची दखल घेतली. शिंदे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात नाहीत. शिंदे यांच्या पक्षाची बोलायचे ते करायचे अशी भूमिका आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी