27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयशिवसेना स्टाईलने उत्तर द्याच, मनसेचे आव्हान

शिवसेना स्टाईलने उत्तर द्याच, मनसेचे आव्हान

टीम लय भारी

ठाणे : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका या प्रकरणावरुन ठाण्यात शिवसेना विरुद्ध मनसे असा वाद रंगला आहे ( MNS challenged to Shivsena ).

शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असे म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावे. आम्ही वाट पाहतोय असे आव्हान मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी खासदार राजन विचारेंना दिले आहे ( Avinash Jadhav challenged to Rajan Vichare ).

ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांनाही एक दिवस अशाच प्रकारे घरातून उचलून नेऊ, या अविनाश जाधव यांच्या विधानावरुन शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मनसेला थेट आव्हान दिले. आम्ही पदावर असलो तरी शिवसेनेत आमचे एक पद आहे ते शिवसैनिक. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, गरज भासल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ, असे राजन विचारे म्हणाले होते. त्यावर अविनाश जाधव यांनी आता त्यांना आव्हान दिले आहे.

हे सुद्धा वाचा

नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी – शिवसेना

उध्दव साहेब हा ‘खेकडा’ शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा

मनसेचे राजेश टोपेंना आव्हान; मोफत उपचार घेतलेले रूग्ण दाखवा, नाहीतर राजीनामा द्या

मनसे – शिवसेनेमध्ये जुंपली, ‘मनसे’कडून पुन्हा आरोपांच्या फैरी

मनसेने 48 तासांत माफी मागावी, अन्यथा… : युवा सेनेकडून ‘कायदेशीर’ इशारा

याबाबत अविनाश जाधव म्हणाले की, मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदर करतो. कोणत्याही शिवसैनिकाला उचलणे हा माझा धंदा नाही. आम्ही सगळे बाळासाहेबांच्या मुशीतले आहोत. आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे शिवसैनिकांबद्दल मनात नितांत आदर आहे. मी म्हटले होते जे आम्हाला त्रास देतात ‘ते’. तुम्ही आम्हाला त्रास देतायेत का असा अर्थ होतो. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याबद्दल ‘ते’ का नाही बोलले? असा सवाल जाधव यांनी केला.

जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा त्रास देणा-यांना असेच उचलून नेऊ हे विधान होते. मला शिवसैनिकांचा नितांत आदर आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ. आज अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे राजसाहेबांचा आदर करतात, असे जाधव म्हणाले.

दरम्यान, एरवी एकमेकांचे तोंडही न बघणारे ठाण्यातील शिवसेनेचे खासदार, आमदार व पदाधिकारी असे सगळे मनसेच्या अविनाश जाधव यांच्या विरोधात एकत्र आले आहेत ( Shivsena united against MNS ).

एका रात्रीत आणि केवळ व्हिडीओ बाईट देऊन कोणी नेता बनत नाही. उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ. प्रत्येकजण कर्तृत्वाने मोठा होत असतो. कार्यकर्ता असाच घडत नसतो, सकाळी व्हिडीओ करायचा, टीका करायची आणि सोडून द्यायची अशा शब्दांत राजन विचारे यांनी निशाणा साधला होता.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी