28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रपुढील दीड महिना पर्यटकांसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची दारे राहणार बंद

पुढील दीड महिना पर्यटकांसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची दारे राहणार बंद

टीम लय भारी

चंद्रपूर : राज्यात पावसाला सुरुवात झाली असून, या मोसमात अनेक पर्यटक भटकंती करण्यासाठी बाहेर पडतात. बहुतांश पर्यटक पावसाळ्यामध्ये जंगलात भटकंती करण्याला पसंती देतात. अशावेळी पर्यटक निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी धबधबे, आणि घनदाट जंगलांना भेटी देतात. पण या ऋतूमध्ये अनेक उद्याने बंद देखील ठेवण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्य देखील बंद ठेवण्यात येणार आहे.

३० जून २०२२ ते १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ताडोबा राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र या दरम्यान या उद्यानातील बफर झोन खुला राहणार आहे. त्यामुळे पक्षी प्रेमींना याठिकाणी जाता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरवर्षी मान्सूनमध्ये देशातील अभयारण्ये बंद ठेवण्यात येतात. त्यातील ताडोबा हे एक आहे. वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची सर्वाधिक पसंती ही ताडोबा अभयारण्याला असते.

ताडोबा हे जंगल सफारीसाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. येथे दरवर्षी अनेक पर्यटक प्रेमी भेट देत असतात. ताडोबा अभयारण्यात जंगल सफारी करण्यासाठी विशेष खुल्या जीपची व्यवस्था करून देण्यात येते. तसेच येथे पर्यटकांना येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची माहिती देण्यासाठी प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक देखील देण्यात येतात.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे दर्शन घेणार, अन् बहुमताला सामोरे जाणार

आमदार फुटला, पण त्याचे फेसबुक चालवणारा शिवसैनिक नाही फुटला

एकनाथ शिंदेंनी दिले ५१ लाख रुपये

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी