27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयदेशात मुस्लिम, दलित आणि आदिवासी बहुजनांच्या नरसंहाराची शक्यता : प्रकाश आंबेडकर

देशात मुस्लिम, दलित आणि आदिवासी बहुजनांच्या नरसंहाराची शक्यता : प्रकाश आंबेडकर

देशामध्ये जातीय द्वेष आणि त्यातून हत्या घडवून आणण्याचा भाजप – आरएसएसचा इतिहास पाहता, हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा पारंपरिक अजेंडा असल्याचे दिसते. देशात पुन्हा निवडणुका तोंडावर असताना गुजरात दंगलींप्रमाणे भारतातील लोकशाहीची आणि देशातील मुस्लिम, दलित आणि आदिवासी बहुजनांचा नरसंहार आणि हत्या करण्यास ते मागे पुढे पाहणार नाहीत ह्याची शक्यता वाटते. असे  गंभीर  विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

त्यांनी ट्वीट करत थेट भाजपा-आरएसएसवर हल्ला चढवला. आपल्या ट्वीटमध्ये ते पुढे म्हणाले की, अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी भाविकांना झेड+ सुरक्षा प्रदान करत असतानाच श्रीराम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा दलाकडे (एनएसजी) सोपवावी अशी मी गांभीर्यपूर्वक मागणी करत आहे. असं ट्वीट करत त्यांनी देशातील संभाव्य प्रमुख मुद्दयाकडे लक्ष वेधले आहे.

केंद्रातील भाजपा सरकारला cag ने फटकारले आहे. देशात भाजपा विरोधातील २८ पक्ष इंडिया या बॅनर खाली एकवटले आहेत. त्यामुळे मोदी यांना लोकसभा निवडणुका वाटतात तितक्या सोप्या राहिलेल्या नाहीत. या सगळ्या परिस्थितीत गुजरात दंगलीसारखी दंगल घडवून मतांचे ध्रुवीकरण भाजपला करायचे आहे, असा आरोप विरोधक कायम करत असतात, आता त्यात प्रकाश आंबेडकर यांची भर पडली आहे.

दरम्यान, गुजरात दंगलीत 1000 हून अधिक लोक मारले गेले. यात बहुतांश मुस्लीम होते. याआधी गोध्रा ट्रेनला लागलेल्या आगीत 60 हिंदूंचा मृत्यू झाला होता. या दंगलीत गुलबर्ग सोसायटी हत्याकांडात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांचा मृत्यू झाला होता. झाकिया जाफरी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह 63 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने 2012 मध्ये आपला रिपोर्ट दिला.

हे सुद्धा वाचा
मराठा आरक्षण: शिष्याच्या मदतीला धावला गुरू
जिनिलिया वाहिनी पुन्हा गरोदर?
ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा, स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत देशपातळीवर पटकाविला तिसरा क्रमांक

2002 च्या गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी जी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) स्थापन केली होती, त्याचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 24 जून रोजी दिलेल्या निकालात कायम ठेवला आहे. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 60 हून अधिक लोकांना क्लीन चिट देण्यात आली आहे. दंगलीत मारले गेलेले काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी गुजरात दंगली प्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या रिपोर्टला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यांनी केलेला दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी