32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयनितेश राणे यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी?

नितेश राणे यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी?

टीम लय भारी

सिंधुदुर्ग:- शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना कोर्टानं सुनावलेली दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज, शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आता त्यांना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी? आणि त्यानंतर त्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल करणार का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सिंधुदुर्ग पोलिसांकडू कोठडी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवली जातेय.(Nitesh Rane in police custody or court custody)

नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला होता. नितेश राणे यांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले होते.

हे सुद्धा वाचा

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

नितेश राणे यांना खोडसाळ प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता, राणेंच्या वकिलांचा दावा

नितेश राणेंना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर शिवसेनेकडून आली पहिली प्रतिक्रिया

Explained: Nitesh Rane surrenders; what is the attempt-to-murder case against him?

नितेश राणे यांनी 10 दिवसांत सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते.न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज करणार होते. परंतु, अचानक निर्णय बदलत ते जिल्हा सत्र न्यायालयाला शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालीन कोठडी सुनवण्यात आली.आज, शुक्रवारी राणे यांच्या पोलीस कोठडीची मदत संपत आहे. त्यामुळे त्यांना दुपारपर्यंत न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात येणार आहे.

मागील दोन दिवस आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. आमदार राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची एकत्रित चौकशी करण्यात आली. त्यानंतर नितेश राणे यांची कणकवली पोलिसांनी साडेपाच तास चौकशी केल्यानंतर गोवा येथील नीलम बिट्स या हॉटेलमध्ये त्यांना नेले.

तेथेही त्यांची चौकशी करण्यात आली. याच हॉटेलमध्ये संतोष परब यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती मिळाल्याचे समोर आले होते. त्यानुसार, पोलिसांनी यासंदर्भात चौकशी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी