33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय'जास्त दिवस घोंगडं भिजवत ठेवलं तर त्याचा वास येणारच'

‘जास्त दिवस घोंगडं भिजवत ठेवलं तर त्याचा वास येणारच’

राज्यात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation) मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा समाजाने सरकारला मराठा आरक्षणाची मागणी केली. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये विलीन करण्याबाबत मराठा समाजाने सरकारकडे मागणी केली आहे. मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आरक्षण द्यावं अशी मागणी आहे. अशातच आता भाजपचे नेते माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मराठा समाजाला अजूनही आरक्षण न मिळाल्याने संताप व्यक्त केला आहे. ‘घोंगडं कितीही दिवस जास्त भिजवत ठेवलं तरीही वास येणारचं, असं म्हणत उदयनराजे यांनी सराकारवर निशाणा साधला आहे.

अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (manoj jarange-patil) हे अंतरवाली सराटीतून पायी दिंडी करत मुंबईला कूच करणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर ते उपोषण करणार आहेत. सरकार केवळ आरक्षणाच्या हुलकावण्या देत असल्याचं मराठा बांधवांचं म्हणणं आहे. मराठा समाजाने आता काही ठिकाणी कुणबी प्रवर्गातील नोंदी शोधायला सुरूवात केल्या आहे. यामुळे आता मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचं म्हणाले आहेत. यावर आता उदयनराजे भोसले यांनी सरकारसह शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले उदयनराजे भोसले 

‘इतर राज्यांप्रमाणे आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी’, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘त्यावेळी मंडल आयोगाबाबतीत केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आरक्षण मर्यादा वाढवल्याने सहज प्रश्न सुटेल. आरक्षण मर्यादा ७० ते ७२ टक्के करा हाच एक पर्याय आहे’, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

हे ही वाचा

तरूणाची पुणे ते आयोध्या सायकलवारी

डंकी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत?

‘नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईल’

मराठा आरक्षण मुद्दा आणि ओबीसींचा विरोध

मराठा समाज अनेक महिन्यांपासून आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र सरकार केवळ आश्वासन देत असल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचं मराठा समाजाने सांगितलं आहे. अशातच मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये सामावून घेण्यासाठी मराठा बांधव सरकारकडे मागणी करत आहे. मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, अशी मागणी सरकारला करत आहे. मात्र आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे यासाठी राजयभरामध्ये सभा घेत आंदोलन झालं, यानंतर जरांगे मुंबईला पायी दिंडी करत आझाद मैदानावर आरक्षणाची मागणी करणार असल्याचं म्हणाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी