29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
HomeराजकीयAmit Shah slams Gandhi:‍ 'राहूल गांधींची रस्त्यावर यात्रा, टी शर्ट मात्र 40...

Amit Shah slams Gandhi:‍ ‘राहूल गांधींची रस्त्यावर यात्रा, टी शर्ट मात्र 40 हजाराचा’

राहुल गांधींनी भारत हा देश नसून युरोप प्रमाणे विविध राज्यांचा एक संघ आहे असे विधान काही महिन्यांपूर्वी लंडन‍ येथील एका चर्चासत्रामध्ये केले होते. गांधीच्या त्या विधानावर टीका करत शाह म्हणाले की, तेच राहुल गांधी आज भारताला जोडण्याच्या बाता मारत आहेत.

देशाचे गृहमंत्र‍ी आणि भारतीय जनता पक्षाचे (Bhartiya Janta Party) वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शनिवारी टीका करताना बोलले की, 52 वर्षीय काँग्रेस नेत्याला भारताचा इतिहास वाचण्याची नितांत गरज आहे. शाह यांनी पुढे असे नमूद केले की, राहुल गांधी हे सध्या ‘भारत जोडो’ या अभियानाअंतर्गत देशाच्या विविध राज्यांमध्ये पदयात्रेसाठी निघाले आहेत परंतु ते या यात्रेदरम्यान एका विदेशी ब्रँडचा टी-शर्ट घालून मिरवत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra) यात्रेदरम्यान सुमारे 40,000 रूपयांचा डिझायनर टी-शर्ट घालून फिरत असल्याचा आरोप केला आहे. अमित शाह सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. तेथे ते राज्याच्या वरिष्ठ नेत्यांशी आण‍ि कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्षाला अधिक बळकट करण्याचे प्रयत्न करत आहेत. राहुल गांधीनी भारत हा देश नसून युरोप प्रमाणे विविध राज्यांचा एक संघ आहे असे विधान काही महिन्यांपूर्वी लंडन‍ येथील एका चर्चासत्रामध्ये केले होते. गांधीच्या त्या विधानावर टीका करत शाह म्हणाले की, तेच राहुल गांधी आज भारताला जोडण्याच्या बाता मारत आहेत.

राहुल गांधीवर टीका करताना शाह पुढे म्हणाले की, वायनाडच्या खासदारांना भारताचा इतिहास वाचण्याची खूप गरज आहे. राहुल गांधीनी काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये भारत हा देश नसल्याचे विधान केले होते. मला त्यांना विचारायचे आहे की त्यांनी कोणते पुस्तक वाचले आहे? हया देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्कर्षासाठी खूप लोकांनी आपल्या प्राणांची बलिदान केले आहे. गांधी हे सध्या भारत जोडण्याच्या मिशनवर आहे परंतु त्यांना प्रथम भारताचा इतिहास वाचण्याची गरज आहे.

काँग्रेस पक्षाकडे लोकांचा आणि देशाचा विकास करण्याची पात्रता नाही. ते फक्त वोट बँकचे राजकारण करण्यामध्ये तरबेज आहे अशी खरमरीत टीकाही शाह यांनी काँग्रेसच्या नेत्यांना उद्देशून केली.

हे सुद्धा वाचा –

Exclusive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारचे चार बंगले बळकावले!

Uddhav Thackeray- Varkari Meeting : उद्धव ठाकरेंच्या भेटीला वारकरी मातोश्रीवर

Indian Cricket Team : राहुल द्रविडचे मोठे वक्तव्य, भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर केले भाष्य

एका वायरल व्हीडीओ मध्ये राहुल गांधी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा भाग म्हणून तामिळनाडू मधील जॉर्ज पोनियाह या पादऱ्याशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यामध्ये राहुल गांधीनी त्यांना प्रश्न केला की, खरा देव कोण आहे? त्या प्रश्नाला उत्तर देताना त्या पादऱ्याने असे म्हटले की, येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे कारण ते मनुष्याच्या रूपाने अस्तित्वात होते आणि बाकीचे देव व देवतांची शक्ती हे केवळ थोतांड आहे. तामिळनाडूच्या त्या पादऱ्याच्या विधानाचा समाचार घेत भाजप नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे हिंदू देवतांचा अनादर करणाऱ्या भावनांना खतपाणी घालत असल्याचा आरोप केला.

भाजपच्या नेत्यांचे आरोप फेटाळून लावत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, भाजप ज्या व्हीडीओचा आधार घेऊन राहुल गांधीवर टीका करत आहेत तो एक खोटा व्हीडीओ आहे आणि राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. भारतीय जनता पक्षाने पूर्वीपासून देशाला तोडण्याचे काम केले आहे, तर काँग्रेसने सदैव देशाच्या एकजुट करण्याचे प्रयत्न केले आहेत.

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतचा प्रवास येत्या 150 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहेत. येत्या काळात काँग्रेस पक्षाकडून सामान्य जनतेशी संवाद साधण्याचा हा एक मोठा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते 12 राज्ये आणि 2 केंदशासित प्रदेशांचा दौरा करत स्थानिक जनतेशी संवाद साधणार आहेत.

 

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी