29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रLayBhari Exclusive : मुख्यमंत्र्यांची राजकीय सभा, गर्दी जमविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा...

LayBhari Exclusive : मुख्यमंत्र्यांची राजकीय सभा, गर्दी जमविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा लेखी आदेश !

एकनाथ शिंदे यांच्या कथित शिवसेना पक्षाची पैठण येथे सभा आयोजित केली आहे. या सभेला गर्दी जमविण्यासाठी चक्क सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. पण या ४० पैकी जवळपास सगळ्याच आमदारांच्या विरोधात जनतेमध्ये मोठी नाराजी आहे. या आमदारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना नागरिक उपस्थिती दाखवत नाहीत. अशा अनेक कार्यक्रमांमधील रिकाम्या खुर्च्यांची छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. परंतु याच मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या सभांना मात्र तुफान गर्दी झालेली दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर कार्यक्रमांना उपस्थिती दाखविली तर त्यांच्या सभांना गर्दी होईल याची काहीही खात्री नाही.

या पार्श्वभूमीवर आता सभा, बैठकांना गर्दी वाढविण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर सुरू करण्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या एका आदेशातूनच हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी व्हावी यासाठीच हा आदेश जारी केला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Eknath Shinde paithan tour
या कार्यक्रम पत्रिकेनुसार एकनाथ शिंदे यांची पैठण येथील सभा राजकीय असल्याचे दिसते

येत्या सोमवारी, १२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण या ठिकाणी सभा आयोजित केली आहे. शिंदे गटातील आमदार व विद्यमान रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा पैठण हा मतदारसंघ आहे. काही दिवसांपूर्वी पैठण मतदारसंघात भुमरे यांनी सभा घेतली होती. या सभेच्या रिकाम्या खूर्च्यांची छायाचित्रे सर्वत्र व्हायरल झाली होती. याच मतदारसंघात नंतर आदित्य ठाकरे यांची सभा झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या सभेला त्यावेळी तुफान गर्दी झाली होती.

आता एकनाथ शिंदे यांच्या कथित शिवसेना पक्षाची पैठण येथे सभा आयोजित केली आहे. या सभेला गर्दी जमविण्यासाठी चक्क सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Exclusive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारचे चार बंगले बळकावले!

Breaking : 12 आमदार नियुक्त्यांचे प्रकरण पुन्हा न्यायालयात, राज्यपालांनी न्यायालयाची बेअदबी केल्याची याचिका!

Maharashtra Politics : ‘भाजपला मुंबई ‘ठाकरे’मुक्त, तर बारामती ‘पवार’मुक्त करायची आहे’

या सभेसाठी पैठण विभागातील पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना उपस्थित राहण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी जारी केला आहे. ४२ गावांतील पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना उपस्थित राहण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांची सूचना आहे, असे या आदेशात नमूद केले आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामार्फत कार्यक्रम पत्रिका जारी करण्यात आली आहे. त्यात पैठण येथील कार्यक्रमाबद्दल ‘शिवसेना पक्षाच्या जाहीर सभेस’ असे नमूद केले आहे. याचा अर्थ हा कार्यक्रम राजकीय आहे. राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश देणे हे कुठल्या नियमांत बसते असा सवाल उपस्थित झाला आहे.

पैठण येथील कावसानकर स्टेडीयमध्ये दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सकाळी १० वाजताच उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या अगोदर चार तास उपस्थित राहण्याची ही सूचना अजब आहे. स्टेडीयम रिकामे राहू नये म्हणून तर ही काळजी घेण्यात आली नाही ना ? आयत्या वेळी उस्फूर्त गर्दी झाली नाही तर आदेशामुळे आलेल्या लोकांची तरी गर्दी दिसेल असाच यामागचा हेतू असावा असे दिसत आहे.

गंमत म्हणजे, आज शनिवार आहे. सरकारी कार्यालयांना सुटी असते. सुटीच्या दिवशीसुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आदेश जारी करण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले आहे. धक्कादायक म्हणजे, अंगणवाडीतील सर्व कर्मचारी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय सभेला उपस्थित राहिल्यानंतर अंगणवाडीतील बालकांवर कोण लक्ष देणार ? त्या दिवाशी अंगणवाड्या सुरू राहणार की बंद याबाबत काहीही नमूद केलेले नाही. यावरून देशाचे भवितव्य असलेल्या बालकांबद्दल सरकार किती गंभीर आहे हे लक्षात येते.

दरम्यान, ‘लय भारी’कडून ही बातमी प्रसिद्ध होत असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा एक ट्विट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी