27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयराजेश टोपेंच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

राजेश टोपेंच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील कानाकोपऱ्यात राजकीय वातावरण तयार झालं आहे. (२ डिसेंबर) दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या चारचाकी गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. यावेळी गाडीची काच फोडण्यात आली असून गाडीभोवती दगड आणि लाकडी दांडा पडला असून तेलाची बाटली पडली असल्याची माहिती समोर येत आहे. हा हल्ला जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या ठिकाणी झाला आहे. सध्या राज्यात निवडणुकांचे वातावरण आहे. जालन्यातही जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुका सुरू आहेत. जालना हे सध्या राज्यातील राजकारणातील केंद्रस्थान असल्याचं म्हटलं जात आहे. याच ठिकाणी टोपेंच्या गाडीवर हल्ला झाला आहे.

काही दिवसांपासून जालना जिल्ह्याची मराठा आरक्षणामुळे अधिक चर्चा होत होती. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत जालना हे अधिकाधिक राजकीय असो वा सामाजिक असो राज्याच्या केंद्रस्थानी आहे. अशातच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक असल्याने राजेश टोपे बॅंकेत आले असता, त्यांच्या चार चाकी गाडीवर हल्ला झाला होता, यावेळी टोपेंच्या गाडीचा ड्रायव्हर त्याच ठिकाणी उपस्थित होता. यावेळी काही चार ते पाच अज्ञातांनी गाडीवर दगडफेक केली. हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी टोपेंनी केली आहे.

हे ही वाचा

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार की आणखी कोण?

‘मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चार लाख बेरोजगारांची नोंद’

संघर्ष केला नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवार खपवून घेणार नाहीत

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुका जालन्यात सुरू आहेत. यावेळी राजेश टोपेंनी बॅंकेसमोर आपली गाडी पार्क केली होती. यावेळी गाडीजवळ टोपेंचा ड्रायव्हर होता, काही लोकांनी गाडीवर हल्ला केला आहे. मात्र यामागे कोणचा हात असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गाडीच्या समोरील काचेवर दगडफेक करण्यात आली. यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे. गाडीवर हल्ला केलल्यांबाबत अजूनही कोेणतीच माहिती समोर आली नाही. ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, तसेच सदर बाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी