28 C
Mumbai
Friday, February 9, 2024
Homeराजकीयबारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार की आणखी कोण?

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार की आणखी कोण?

आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे आता देशभर वाहू लागले आहे. अशातच आता राज्यातही लोकसभा निवडणुकांची चांगली चर्चा आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही फारच चर्चेत आहे. कारण यंदाच्या निवडणुकीपूर्वी पक्षात फूट पडली आहे. यामुळे आता एकाच पक्षातील उमेद्वार विरोधात उभे राहणार की काय? असा सवाल उपस्थि होत आहे. कर्जत येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिबिर झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चार ठिकाणी जागा लढवणार असल्याचे सांगितलं आहे. बारामती येथे खासदार सुप्रिया सुळे असल्याने त्यांच्याविरोधात नेमकं कोणाला संधी द्यायची याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत आहे.

राजकीय क्षेत्र आणि नातेसंबंध या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत जर सुप्रिया सुळेंविरोधात जर सुनेत्रा पवारांना विरोधक म्हणून उभं केलं तर कदाचित नात्यात संभ्रम निर्माण होण्याची चिंता अधिक वाढू शकते. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास सुप्रिया सुळेच खासदारपदी निवडून येत आहेत. सुनेत्रा पवारांना विरोधक म्हणून संधी दिल्यास त्यांची ताकद कमी पडू शकते. तर अजित पवारांची इंदापूर, दौंड आणि खडकवासला येथे ताकद कमी पडते. यामुळे आता अजित पवार सुनेत्रा पवारांना संधी देणार नसल्याच्या चर्चा आहेत. यासाठी अजित पवारांनी प्लॅन बी तयार केला आहे. सुप्रिया सुळेंविरोधात दुसरं तिसरं कोणी नसून भाजपचे नेते राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना संधी देण्यात येऊ शकते.

हे ही वाचा

संघर्ष केला नाही असं म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवार खपवून घेणार नाहीत

‘नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करा’

‘वंशाचा दिवा मुलीच लावतात’

कांचन कुल या जरी भाजपमध्ये कार्यरत असल्या तरीही त्यांना राष्ट्रवादीतून निवडून आणण्याचं प्लॅनिंग आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यात मोठ्या प्रमाणात लढत झाली होती. कुल यांनी सुप्रिया सुळेंना चांगलीच टक्कर दिली होती. मात्र सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा खासदार पदावर आपलं नाव कोरलं. यंदा सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल हा पर्याय आहे. जर कांचन कुल यांना उमेद्वारी दिल्यास भाजप संपूर्ण पाठबळ हे अजित पवार यांना मिळणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित ताकदीमुळे अजित पवार गटाचा विजय होणे सोपे होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी