35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयरोहित पवार - देवेंद्र फडणवीस आले आमने सामने

रोहित पवार – देवेंद्र फडणवीस आले आमने सामने

टीम लय भारी

अहमदनगर :- नुकताच माजी मंत्री राम शिंदे यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडला. लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांची आमनेसामने भेट झाली. दोघांनी हसतमुखाने एकमेकांना नमस्कार केला. (Rohit Pawar – Devendra Fadnavis came face to face)

माजी मंत्री राम शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आमनेसामने आले होते. तेव्हा रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना नमस्कार केला. राजकीय मतभेद असले तरी ते या दोघांमध्ये मंगलप्रसंगी कुठेही दिसून आले नाहीत.

Video : योगाचा 25 वर्षांपासून प्रसार करणाऱ्या विणा मालडीकर

आजपासून ३० ते ४४ वयोगटाला मोफत लसीकरण

दोघांनीही नव दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांशी संवाद साधून लगेच निरोपही घेतला. (Rohit Pawar and Fadnavis interact with each other)

Rohit Pawar - Devendra Fadnavis came face to face
रोहित पवारांनी नव दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या

रोहित पवार यांनी राम शिंदेंच्या कौटुंबिक सोहळ्याला हजेरी लावण्यात नवल नाही. कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. (Rohit Pawar had defeated Ram Shinde in the Assembly elections)

कल्याणमध्ये नशेच्या गर्तेत तरुणाईला लोटणाऱ्या “पेपरबॉम्ब”चा पर्दाफाश

On Covid-19 vaccine, Ravi Shankar Prasad’s appeal to Rahul Gandhi

रोहित पवार आणि राम शिंदे दोघांनी ही राजकीय मतभेद बाजूला ठेवून मंगलप्रसंगी दोन्ही नेते एकत्र आले. रोहित पवार राजकीय विरोधक असूनही त्यांचा स्नेह सर्वांना परिचित आहे. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी विधानसभा निवडणूक गाजली होती.

रोहित पवारांनी विजयानंतर सर्व मतभेद बाजूला ठेवून, राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला होता.

Rohit Pawar - Devendra Fadnavis came face to face
रोहित पवार

राम शिंदे यांना डॉक्टर लेकीसाठी IAS जावई मिळाला आहे. राम शिंदे यांच्या कन्येचे लग्न हे श्रीकांत खांडेकर यांच्याशी झाले आहे. श्रीकांत खांडेकर हे मध्यमवर्गीय घरातील आहेत.

राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता शिंदे यांच्या लग्न समारंभाला देवेंद्र फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळींनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अक्षता शिंदे आणि IAS  श्रीकांत खांडेकर यांचा साखरपुडा व्हॅलेंटाईन डेला झाला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी