33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीययोगाचे फायदे, प्रकार, मिथके, कुणी करावे; वाचा सविस्तर माहिती

योगाचे फायदे, प्रकार, मिथके, कुणी करावे; वाचा सविस्तर माहिती

मृगा वर्तक : टीम लय भारी

योग विद्या ही इतर भारतीय विद्यांसारखीच प्राचीन विद्या आहे. तिचा आदिकाल शोधणे तसे कठीण. परंतु २७ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या युनायटेड नेशन जनरल असेंम्बली (UNGA) मध्ये भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून योग विद्येची जगाला ओळख करून दिली. त्यांनतर UNGA ने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर केला. येमेन वगळता इतर सर्व सदस्य राष्ट्रांनी योग दिवस साजरा केला. (UNGA has declared June 21 as International Yoga Day.)

योग सरावाचे फायदे

नियमित योग सराव आपल्या शरीराची लवचिकता आणि ताकद वाढवतो. त्याच बरोबर पोटाचे व पाठीचे स्नायू बळकट होतात. विशुद्ध मानसिक स्थितीत नियमित योग केल्याने ताण तणावावर नियंत्रण मिळते (Doing yoga helps control stress). झोप चांगली लागते. रक्तदाब नियमित राहण्यास मदत होते. तसेच मायग्रेनसाठी योग अभ्यास महत्वाचा ठरतो. इतर सर्व शारीरिक आजारांवर योगाचे किती फायदे होतात यावर अजून संशोधन सुरू आहे. परंतु मायग्रेन वर औषधांपेक्षा योगाचा सराव जास्त परिणामकारक सिद्ध झाला आहे.

Video : योगाचा 25 वर्षांपासून प्रसार करणाऱ्या विणा मालडीकर

आजपासून ३० ते ४४ वयोगटाला मोफत लसीकरण

योगाचे मुख्य प्रकार

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्यहर, धारणा, ध्यान व समाधी हे योगाचे मुख्य आठ प्रकार आहेत. आसनांचे वर्गीकरण या आठ प्रकारात केले गेले आहे.

योग सराव कुणी करू नये

मानसिक आणि शारीरिक थकवा असल्यास त्या दिवसापूरती योगास सुट्टी दिली तर चालते. तसेच कोणतेही शारीरिक दुखणे असताना योग करू नये (Do not do yoga when there is physical pain). घाईघाईत नियमितता असावीच म्हणून योग उरकू नये. शांतचित्ताने योग सराव करावा. योग करण्यास उत्तम वेळ म्हणजे पहाटे किंवा संध्याकाळी, जेवणानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर योग करू नये. स्त्रियांनी मासिक पाळीदरम्यान 5 दिवस योग सराव करू नये. पाठदुखी आणि इतर हृदयासंबंधीत आजार असलेल्यांनी सगळीच आसने करू नयेत. त्यांच्यासाठी काही आसने वेगळ्या प्रकारे शिकवली जातात. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी चक्रासन, शीर्षासन आदी छातीपेक्षा डोके ज्या आसनात खाली जाते ती आसने करू नयेत.

UNGA has declared June 21 as International Yoga Day
आंतरराष्ट्रीय योगा दिवस

रोहित पवार – देवेंद्र फडणवीस आले आमने सामने

Yoga Day 2021 LIVE Updates: PM Modi launches mYoga app, says will help fulfill motto of ‘One World, One Health’

मिथके

योग अभ्यासाबद्दल काही चुकीचे मतप्रवाह जनमानसात सर्रास आढळतात ज्याला काहीही आधार नाही, ते पुढील प्रमाणे

१. योग विद्या ही फक्त हिंदू संस्कृतीतील लोकांसाठी आहे.

२. कुणीही योग पुस्तके वाचून किंवा इंटरनेट वरून शिकू शकतो.

३. योगी होण्यासाठी लवचिकता असणे गरजेचे आहे.

४. योग हा फक्त तरुणांसाठी फायदेशीर आहे.

५. योग सरावाने फक्त शरीराची ठेवण सुधारते.

६. योग अभ्यास व योग सराव हा वेळखाऊ आहे.

७. नियमित योग सरावाने आपल्या जीवनशैलीत खूप मोठे बदल घडतात.

८. अस्थमा असलेल्या लोकांनी योग करू नये.

वरील गैरसमज टाळल्यास योग उत्तम प्रकारे समजून घेता येतो.

श्वसन प्रकार व आसने, त्यांचे उपयोग आणि परिणाम

1. सूर्यनमस्कार – सुर्यनमस्काराने मन शांत होते तसेच मनाची एकाग्रता वाढते. लवचिकता वाढते व शरीरातील मेद कमी होतो. रक्ताभिसरण क्रिया उत्तम होते तसेच शरीराच्या आतील अवयवांचे काम सुलभ होते. शरीराची ठेवण सुधारते व निद्रानाशाचा त्रास असल्यास नियमित झोप लागण्यास मदत होते.

2. ओंकार – या क्रियेत हृदय, फुफ्फुसे व घसा या अवयवांवर ताण येतो, ओंकार नादामुळे घशातील स्पंदनांमुळे आवाज मोकळा होतो व सायनस मोकळे होतात. तसेच त्याचे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी (cardiovascular) फायदे सुद्धा आहेत. रक्तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच हृदयाच्या ठोक्यांची लय सुधारते.

३. नाडी शोधना किंवा कपालभाती – यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते व सर्दीपासून लांब राहता येते.

४. शितळी आणि शीतकारी – हे दोन्ही प्रकार शरीरात थंडावा निर्माण करतात. परंतु बाहेर पाऊस पडत असेल किंवा वातावरण थंड असेल/AC चालू असल्यास हे प्रकार करू नये त्यामुळे लगेच सर्दी होऊ शकते.

५. भ्रमरी – घशातून हुंकारासारखे आवाज काढणे, यामुळे घसा मोकळा होण्यास व बरगाड्यांखालील कफ मोकळा होण्यास मदत होते.

६. उद्दीयान बंध – हा शब्द उड्डाण या शब्दापासून आलेला आहे, पद्मासन लावून शरीरास लावता येतील ते सारे बंध लावून जोरदार उच्छ्वास करण्याची क्रिया, यामुळे शरीरात गर्मी तयार होते. गर्मीच्या दिवसात उद्दीयान बंध लावल्यास काही लोकांस उष्णतेचे त्रास होऊ शकतात. शरीरात उष्णता अधिक प्रमाणात असलेल्यांनी हा श्वसन प्रकार करू नये.

७. नेती – एका श्वासनलिकेतून पाणी आत सोडून दुसऱ्या नलिकेतून ते बाहेर काढणे म्हणजे नेती होय. यामुळे  नाकपुड्या शुद्ध होऊन सर्दीचा त्रास होत नाही. कोणी जाणकार व्यक्ती किंवा योग शिक्षकांच्या अनुपस्थितीत हा प्रकार करू नये, चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात.

८. वमन – पाणी किंचित गरम करून त्यात चिमूटभर मीठ टाकून अगदी घशापर्यंत येईल इतके घोट घोट पिणे व दोन बोटे घशाला लावून पाणी उलटून काढणे. या क्रियेमुळे वात, पित्त व कफ यापासून मुक्ती मिळते. मात्र एखाद्या दिवशी वमन केल्यानंतर 3 दिवस लागोपाठ करावे. जठरातून खेचून काढलेल्या टॉक्सिन्स मुले आतड्यांतून तिथले टॉक्सिन्स जठरात येतात. ते तापदायक ठरू शकतात. ही क्रिया 3 वेळा केल्यानंतर पुन्हा महिनाभर करू नये. पावसाळ्यात वमन करणे शक्यतो टाळावे.

UNGA has declared June 21 as International Yoga Day
21 जून योगा दिन

९. शीर्षासन, सर्वांगासन – या आसनांमुळे मेंदूला रक्त पुरवठा होतो. डोके खाली व पाय वर आशा प्रकारातील ही आसने आहेत.

१०. पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन, वज्रासन, समसन – ही आसने ध्यानमुद्रा प्रकारात मोडतात.

११. शवासन व मकरासन – ही आसने शरीराला तसेच मनाला ताण ताणावांपासून मुक्त करतात.

१२. वृश्चिकासन, ताडासन, विरासन व पर्वतासन – ही आसने शरीरातील स्नायूंना ताण देऊन (strechings) मोकळे करण्यास मदत करतात.

१३. धनुरासन, चक्रासन, बकासन, मयूरासन व हनुमानसन ही आसने थोडी कठीण मानली जातात. नियमित सराव नसल्यास जमत नाहीत.

UNGA has declared June 21 as International Yoga Day
योगाचे प्रकार

कोणतेही आसन या लेखातून वाचून किंवा पुस्तके वाचून आणि इंटरनेट वर पाहून घरच्या घरी करू नयेत. योग प्रशिक्षकांच्या उपस्थितीत शिकून घेऊन त्यांचा सराव करणे उचित होय.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी