31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रआमचं कुठे चुकलं? निधी वाटपावरुन अजित पवार कडाडले

आमचं कुठे चुकलं? निधी वाटपावरुन अजित पवार कडाडले

टीम लय भारी
मुंबईः महाविकास आघाडीत आल्यावर आमच्यावर अन्याय झाला. आम्हाला कमी निधी वाटप केले. अशी रडकथा लावणारया बंडखोर नेत्यांना त्यांनी निधी वाटपाची आकडेवारीच वाचून दाखवली. मी काम करत असतांना भेदभाव कधीच करत नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

पूर्वी 1 कोटी आमदार निधी मिळत होता. मी अर्थमंत्री असतांना 2 कोटी केला.आता 5 कोटी केला. महाविकास आघाडी सरकामध्ये मी अर्थमंत्री असतांना एकनाथ शिंदेच्या नगर विकास खात्याला 3 हजार 12 हजार कोटी दिले. यावर्षी पुरवणी मागणीमध्ये 1 हजार कोटी देण्याचे खाजगीत सांगितले होते. मुख्यमंत्री अंतीम निर्णय घेतात.मगकुठे भेदभाव केला.

लोकप्रतिनिधींच्या शिफारसीने शिवभोजन सुरु केले. उदय सामंत यांना मोकळया हाताने परत पाठवले नाही. यावेळी सभागृहात त्यांनी शिवसेनेच्या कोणत्या आमदाराला किती निधी दिला याची यादीच वाचून दाखवली. काॅंग्रेसच्या नेत्यांनी पण आरोप केले होते. याची आठवण अजित पवारांनी करुन दिली. महाविकास आघडी अनैसर्गिक आहे,अशी ओरड सुरु होती. कारण नसतांना बदनाम केले. विश्वासात घेवूनही हे सगळं करता आले असते असे अजित पवारांनी सांगितले.

हे सुध्दा वाचा:

‘बंडखोर नेत्याला जनता निवडून देत नाही‘- अजित पवार

सभागृहाला शिस्त लावण्याचे काम अध्यक्षांचे : बाळासाहेब थोरात

‘तुमची लायकी आता फक्त बटण दाबण्यापूर्ती’, निलेश राणे यांचा शिवसेनेवर घणाघात

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी