राज्यात राजकीय वातावरण वेगळ्या वळणावर गेल्याचे दिसत आहेत. याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होत आहे. यामुळे मतदारांच्या मनात द्वेशाची भावना निर्माण होऊ लागली आहे. यामुळे तरूण होतकरू कामगारांचे प्रश्न, पेपरफुटी, कंत्राटी भरतीबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) सरकारविरोधात आवाज उठवला आहे. यासाठी त्यांनी २४ ऑक्टोंबरला युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsha Yatra) सुरू केली आहे. ही संघर्ष यात्रा ८०० किमी असणार असून तरूणांच्या प्रश्नांवर अधिक भर असणार आहे. याची सांगता ही डिसेंबर महिन्यात होणार असून आगामी निवडणुकांचा वेध घेत तरूणांच्या उज्जवल भविष्यासाठी रोहित पवारांनी हे उचललेलं पाऊल आहे. संघर्ष यात्रेची चर्चा ही अनेक ठिकाणी होत आहे.
संघर्ष यात्रेत ८०० किमीची पायपीट करत प्रवास असणार आहे. यावेळी तरूणांचे प्रश्न काय आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत. याबाबत माहिती जाणून घेणार आहेत. यासाठी या संघर्ष यात्रेची चर्चा अधिक होताना दिसून येत आहेत. यामध्ये केवळ तरूणच नाहीत तर काही चिमुरडे काही जाणती मंडळी देखील सहभागी होतात. यामुळे युवानेता युवा लोकांसाठी काम करत आहे. तर ही संघर्ष यात्रा घरोघरी पोहोचली आहे.
हे ही वाचा
जावेद अख्तर यांनी मनसे दीपोत्सव कार्यक्रमात दिल्या ‘जय सिया राम’ च्या घोषणा
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीवर नेटिजन्सचा खुलासा
शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ होणार; एकनाथ शिंदे मुंबईकरांना दिवाळी भेट
देशात सध्या दिवाळी सणाने आनंदाचे वातावरण आहे. सर्वांच्या घरोघरी गोड धोड पदार्थांचा फराळ तयार केला जातो आहे. दारात रांगोळी, पणत्या, आयुष्याचा रंग उजळत रहावा आणि आयुष्य प्रकाशमय व्हावे, यासाठी आपण आकाशकंदीलाचा वापर करतो. आकाशकंदील हे वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळी नक्षीकाम केलेले असतात. मात्र आता दिवाळी सणातच एका कुटुंबाने संघर्ष यात्रेचा आकाशकंदील आपल्या घराला लावला आहे. त्याची खूप चर्चा होत असून याबाबतची माहिती रोहित पवारांनी स्वत: ट्वीटद्वारे दिली आहे. यावेळी त्यांनी संघर्ष यात्रेबाबतचे मत चिमुरड्यांमध्ये दिसत असल्याचे सांगितले आहे.
#युवा_संघर्ष_यात्रेचं स्फुल्लिंग केवळ युवांमध्येच उमटत नसून दिवाळीत घराला लावण्यात येणाऱ्या आकाश कंदिलावरही #युवा_संघर्ष_यात्रेने स्थान पटकावलंय… असाच आकर्षक आकाश कंदिल एका कुटुंबाने अभिमानाने घराला लावला…#yuva #sangharsh #yatra #yuvasangharshyatra pic.twitter.com/h2ipPSBvqq
— Yuva Sangharsh Yatra (@sangharshyatra) November 10, 2023
युवा संघर्ष यात्रेचे चिमुरड्यांना वेड
युवा संघर्ष यात्रेचं स्फुल्लिंग केवळ युवांमध्येच उमटत नसून दिवाळीत घराला लावण्यात येणाऱ्या आकाशकंदीलावरही युवा संघर्ष यात्रेने स्थान पटकावलंय. असाच आकर्षक आकाशकंदील एका कुटुंबाने अभिमानाने घराला लावला. असे ट्वीट करत आकाशकंदील हातात घेतलेला लहान भाऊ-बहिणींचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.