28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराजकीयसंजय मंडलिकांनी कोल्हापुरातील शिवसैनिकांची फसवणूक केली : संजय पवार

संजय मंडलिकांनी कोल्हापुरातील शिवसैनिकांची फसवणूक केली : संजय पवार

टीम लय भारी

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. मंगळवारी कोल्हापुरातील खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे गटाची वाट धरताच कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी संजय मंडलिक यांनी कोल्हापुरातील शिवसैनिकांची फसवणूक केल्याचे म्हंटले आहे.

संजय मंडलिक (Sanjay Mandalika) हे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या सर्व बैठकांमध्ये हजर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक गोष्टींवर चर्चा देखील झाली होती. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे अधिक धक्का बसला. समर्थन मोर्चा असो कि शिवसेनेच्या पत्रकार परिषद असो संजय मंडलिक हे सर्व ठिकाणी उद्धव ठाकरे आणि पक्षासोबत हजर होते. ते सांगून गेले असते तर वाईट वाटले नसते. पण त्यांच्या अशा वागण्याने नक्कीच धक्का बसला असल्याचे संजय पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

संजय मंडलिक यांनी विश्वासघात केला
संजय मंडलिक यांच्यासाठी आम्ही खूप राबलो होतो. कोल्हापूरकरांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. एका मराठा चेहरा, कोल्हापूरचे नेतृत्व करणारा चेहरा म्हणून संजय मंडलिक यांच्याकडे पाहिले जायचे. परंतु त्यांनी हा निर्णय घेऊन कोल्हापुरातील शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे.

संजय पवार यांच्यासाठी आम्ही आमच्या जीवाचे रान केले होते, असे सांगताना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे अशा पोपटांसाठी पक्षाची दारे बंद करण्याची विनंती संजय पवार उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचे देखील संजय पवार यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा :

शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा ’गुंता‘ अधिक वाढणार?

हिंदुत्वावर खेळी खेळणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी फटकारले

प्राध्यापक नरकेंनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण सोडणार ?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!