26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीय'दिल्लीतील मंदिराचं स्मशान करून राम तुम्हाला पावणार'?

‘दिल्लीतील मंदिराचं स्मशान करून राम तुम्हाला पावणार’?

राज्यात आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले आहेत. संसदेत झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न समोर येत असल्याने यावर खासदारांनी सरकारला प्रश्न उपस्थित केल्याने सरकारने एकूण १४१ खासदारांना निलंबित केलं असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता याप्रकरणावर संजय राऊत यांनी दिल्लीतील मंदिराचं स्मशान केलं आहे. हे आयोध्येला जाऊन रामाची पुजा करणार, तुम्हाला राम पावणार का? असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपावर टीकेचे असूड सोडलं आहे.

इंडिया आघाडीची काल बैठक झाली कुठेही नाराजीचा सुरू दिसला नाही. २०२४ मध्ये भाजपवर वैफल्यग्रस्त आणि निराश येण्याची वेळ असणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी ईव्हीएमबाबत सांगितलं आहे. इस्रायलमधून एव्हीएम मशीन हॅकिंगचं तंत्र देशात आणलं गेलं आहे. मात्र तिथं निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. अमेरिकामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात. तुम्ही महाशक्तीबाबत बोलता महाशक्ती ही चॅटींग करून होत नाही. तुमच्या महाशक्तीचा आत्मा ईव्हीएम मशीनमध्ये आहे.

हे ही वाचा

मुंबई इंडियन्सकडून फेक फॉलोअर्सचा वापर?

खासदारांना संसदीय समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही

‘लोकशाही बसली धाब्यावर’ अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सरकारला चांगलंच झापलं

लोकशाहीची जबाबदारी आमच्याही खांद्यावर

आम्हा लढत राहू. लोकशाहीची जबाबदारी आमच्याही खांद्यावर आहे. लोकशाहीचं मंदिर मोडायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं. लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि राम मंदिराची पुजा करायची हे ढोंग आमच्याकडे नाही. लोकशाहीचं मंदिर आणि राम मंदिर दिल्लीतील संसद यांची प्रतिष्ठा जपली पाहीजे. जर दिल्लीतील मंदिराचं स्मशान करून आयोध्येत जाणार असाल तर तो राम तुम्हाला पावणार नाही.

तीन राज्यातील निवडणुका जिंकता उन्माद

१४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. हे ऐतिहासिक नाही तर  बेशरमपणाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे भाजप आणि अंधभक्तांनी लोकशाहीच्या मंदिराचे स्मशान बनवलं आहे. आज आम्ही स्मशानात जात आहोत. तीन राज्यातील निवडणुकांच्या विजयामुळे उन्माद आला असल्याची संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी