28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचा शिवसेना भवनावर बोलणाऱ्या प्रसाद लाड आणि नितेश राणेंवर हल्लाबोल

संजय राऊतांचा शिवसेना भवनावर बोलणाऱ्या प्रसाद लाड आणि नितेश राणेंवर हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई:- शिवसेना भवनावर वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांचा शिवसैनिकांनी चांगलाच समाचार घेत आहेत. वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू, प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिक संतापले आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र जास्त काहीही न बोलता संजय राऊतांनी या प्रकरणावर आमचे शाखाप्रमुख बोलतील’, असे केवळ तीन शब्द संजय राऊत म्हणाले आहेत (Sanjay Raut attack on Prasad Lad and Nitesh Rane speaking at Shiv Sena Bhavan).

वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असे वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना नेते-कार्यकर्ते-पदाधिकारी लाड यांचा निषेध व्यक्त करत जशास तसे प्रत्युत्तर देत आहेत. आज सकाळी राऊतांना पत्रकार परिषदेत याचविषयी विचारले असता, संजय राऊत म्हणाले ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ एवढ्याच तीन शब्द बोलून संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांना जास्त महत्त्व दिले नाही.

भाजप नेते बाबूल सुप्रीयो यांचा राजकारणाला रामराम

शिवसेना भवनावर वादग्रस्त बोलणाऱ्या प्रसाद लाड यांच्यावर उदय सामंतांचा हल्लाबोल

नितेश राणे गांजा पिऊन बोलतात

शिवसेना भवन हे कलेक्शन भवन झाले आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्याही टीकेला राऊतांनी उत्तर दिले आहे. काही माणसे गांजा पिऊन बोलतात, त्यांच्याकडे कुठे लक्ष द्यायचे, असे राऊत म्हणाले (Sanjay Raut said that some people drink cannabis and talk about it).

Sanjay Raut attack on Prasad Lad and Nitesh Rane
संजय राऊत

संजय राऊतांचे ट्विट

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असे ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी बोचरी टीका केली (Sanjay Raut tweeted and lashed out at Lad and Nitesh Rane).

केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला

BJP MLC says ‘if time comes, will demolish Shiv Sena Bhavan’, then retracts remark

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजींच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटतं की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.

स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही (Prasad Lad has said that my speech was distorte).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी