32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयशरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळं वंचितांना धक्का; अप्रत्यक्षपणे दिला इशारा

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं वंचितांना धक्का; अप्रत्यक्षपणे दिला इशारा

शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवासांपासून वंचित आघाडी महाविकासआघाडीसोबत निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, दोघांच्यात कोणतीही सकारात्मक चर्चा झालेली नाही. अशातच दोन दिवसांपूर्वी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे चा नारा देत उमेदवारांची यादी जाहीर केली. आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेवर महाविकारआघाडीने कोणतेही उत्तर दिलेलं नाही. पण आज एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे मोठं वक्तव्य करत आपली भूमिका जाहिर केली. (sharad pawar big statement on vanchit bahujan aghadi)

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी पवार यांनी साताऱ्यातील नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान पवार यांनी महाविकास आघाडी आणि जागावाटपावरही सविस्तर भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले पवार?

आम्ही एकत्र आलो आहोत. उमेदवारीबाबत आम्ही चर्चा केली. यावेळची निवडणूक तीन पक्षांनी एकत्र येऊन लढवायची आहे. असं पवार म्हणाले. पवारांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. एकिकडे महाविकास आघाडीचे नेते आमची आंबेडकरांसोबत चर्चा चालू आहे असं सांगत आहेत. तर दुसरीकडे पवारांनी तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केलं आहे.

डाव फिस्कटला; वंचितांनी घेतली जरांगेंची साथ; जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला दिली उमेदवारी

पवारांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात आघाडीतील शरद पवारांचा राष्ट्रवादी गट, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे तीन पक्षच महाविकास आघाडीचा भाग असणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच वंचित काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

वंचितांचा एकला चलो रे चा नारा

माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी मीही मान्य करणार नाही. निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र,आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे आणि लाचार करून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही कदापीही मान्य करणार नाही,” असं म्हणत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरित्या मविआला इशारा दिला होता.

आघाडीत बिघाडी; ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करताच काँग्रेसमधून नाराजीचा सूर

त्यानंतर आंबेडर यांनी जरांगे पाटील यांची साथ घेत उमेदवारांची यादी जाहीर केली. जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला उमेदवारी दिली जाईल असा निर्णय आंबेडकर यांनी घेतला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी