29 C
Mumbai
Friday, March 1, 2024
Homeराजकीयराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 'या' नेत्यांना निमंत्रण

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ‘या’ नेत्यांना निमंत्रण

राज्यामध्ये अनेक दिवसांपासून २२ जानेवारी दिवशी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून अनेक मान्यवरांना तसेच उद्योजकांना तसेच काही खेळाडूंनी साधूंनी निमंत्रण आलं आहे. मात्र काही दिवसांपासून देशभरातून विरोधी पक्षांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण न आल्याचं सांगितलं गेलं आहे. यामुळे राम मंदिराला राजकीय रंग प्राप्त होणार असल्याचं बोललं गेलं आहे. अशातच राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. यामध्ये शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाचा समावेश आहे.

कलाविश्वातून येणार ‘हे’ दिग्गज

२२ जानेवारी दिवशी आयोध्येतील राम मंदिराचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. हा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार असून यासाठी देशभरातून मान्यवर विविध भागातून येणार आहेत. यासाठी कला क्षेत्रातून अभिनेत्री माधुरी दिक्षीत, दक्षिण भारतातील अभिनेते रजनीकांत आणि अमिताभ बच्चन, गायिका आशा भोसले, रामाची भूमिका करणारे अरूण गोविल तसेच सितामाईची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया हे उपस्थित राहणार आहेत.

अशातच उद्योपतींमध्ये मुकेश अंबानी, उपस्थित राहणार आहेत अशातच आता राज्यातील काही नेत्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण न देण्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील राम मंदिराच्या उद्घाटनाला न बोलावल्याचं सांगितलं. मात्र आता अशातच काही नेत्यांना निमंत्रणापासून वगळलं होतं आता त्यांनाही बोलवण्यात आलं आहे.

हे ही वाचा

‘जास्त दिवस घोंगडं भिजवत ठेवलं तर त्याचा वास येणारच’

तरूणाची पुणे ते आयोध्या सायकलवारी

‘नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईल’

राज्यातील ‘या’ नेत्यांना निमंत्रण

राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रिपाई खासदार रामदास आठवले यांना निमंत्रण न दिल्याच्या भावना या सर्व नेत्यांनी व्यक्त केल्या होत्या मात्र आता याच नेत्यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण आलं आहे.

अजित पवारही उद्घाटनाला जाण्याची शक्यता

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. याच्यासोबतच अजित पवार देखील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली.

राज्यातील ३५५ साधू-संत प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रित

काही क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं. काही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. अशातच राज्यातील ३५५ साधू-संतांना प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रित करण्यात आलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी