30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयशिंदेंना फक्त कागदावरच नाव आणि चिन्ह मिळालं; संजय राऊत यांचा टोला

शिंदेंना फक्त कागदावरच नाव आणि चिन्ह मिळालं; संजय राऊत यांचा टोला

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला धनुष्य-बाण आणि शिवसेना नाव बहाल केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे गटाने आक्रमक शैलीत टीकास्त्र सोडले. खासदार संजय राऊत यांनी यामागे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही केला होता. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, अशा बोचरी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले असून शिंदे गटाला कागदावर नाव आणि चिन्ह मिळालं. पण शिवसैनिक आणि जनता मिळाली नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकाराबाबत भाष्य करताना राऊत म्हणाले, शिवसैनिक आणि जनता कुणाला द्यायची हे ठरवण्याचा अधिक निवडणूक आयोग नाही. (Shinde got name and symbol only on paper)

रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा होणार आहे. त्याबाबत राऊत यांनी सांगितले की, “आज संध्याकाळी कोकणात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. ही सभा अतिविराट होईल, असा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, “कोकण कायमच शिवसेनेचा गड राहिला आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या वाढीमध्ये, संघर्षामध्ये कोकणचं योगदान मोठं राहिलं आहे. कोकणाने नेहमी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. त्यामुळे आज खेडमध्ये जाऊन उद्धव ठाकरे सभा घेत आहेत.” राज्यातील अनेक भागांत उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली. मालेगावातही सभा होणार असून त्याची तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या सभांवर सत्ताधारी पक्षाने टीका केली असून पदाधिकारी पक्ष सोडून जातील या भीतीने सभा घेतल्या जात असल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. याबाबत संजय राऊत यांना पत्रकारणनी विचारले असता ते म्हणाले, “ज्यांना निघून जायचं होतं, ते निघून गेले आहे. आता सगळे निष्ठावंत उरले आहेत. ज्यांना पळून जायचं होतं, ज्यांना पलायन करायचं होतं, असे सगळे लोक निघून गेले आहेत. ते निघून गेल्यानंतर आजही शिवसेना त्याच ताकदीने उभी आहे. निघून गेलेल्या लोकांमुळे शिवसेनेवर अजिबात परिणाम झाला नाही.”

हे सुद्धा वाचा

मोदींच्या हुकूमशाहीचा देशातील नेत्यांकडून निषेध; सीबीआय, ईडीचा गैरवापर होत असल्याचा पत्राद्वारे आरोप

अंधभक्तांचे विश्वगुरू गप्प का ? संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल

संदीप देशपांडे हल्ला प्रकरण : महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षाला अटक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी