30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरराजकीयभविष्यात काँग्रेसला सोडचिट्ठी देणार का? रवींद्र धंगेकर म्हणाले...

भविष्यात काँग्रेसला सोडचिट्ठी देणार का? रवींद्र धंगेकर म्हणाले…

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी दणदणीत पराभव केला. त्यानंतर कसबा पेठेत धंगेकर यांच्या विजयाची अभूतपूर्व मिरवणूक निघाली. तब्बल २८ वर्षांनी भाजपच्या हातून हा मतदारसंघ महा विकास आघाडीने हिसकावून घेतला. या पार्श्वभूमीवर भविष्यात काँग्रेसची साथ सोडणार का? असा सवाल रवींद्र धंगेकर यांना वैचारण्यात आला असता त्यांनी अत्यंत प्रांजळ प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले,”नाही, काँग्रेस सोडणार नाही. काँग्रेस हा सर्वसमावेशक आणि विचारांचा पक्ष आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे आभार मानलेच पाहिजे.” (Will you give leave to Congress in future?)

‘झी २४ तास’च्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ या कार्यक्रमात रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “लहान वयात शिवसेनेत गेलो. शिवसेनेत आणि मनसेत असताना मानसन्मान मिळाला. काँग्रेसमध्येही मानसन्मान मिळाला आहे. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली. काँग्रेस सोडणार नाही.” रविंद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना-मनसे आणि आता काँग्रेस असा झाला आहे. ते पुणे महापालिकेत पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. कसब्यात असलेला मोठा जनसंपर्क त्यांच्या विजयाच्या कामाला आला. भाजपचे हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार ०४० इतक्या मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी पराभव केला. सन २००९ साली त्यांचा येथे निसटता पराभव झाला होता. त्यावेळी धंगेकर यांनी मनसेतून भाजपच्या गिरीष बापटांविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी अटीतटीच्या लढतीत अखेर बापट विजयी झाले होते.

कार्यकर्त्यावर प्रेम कसं केलं जातं हे अजितदादांकडून शिकले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी मार्गदर्शन केलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खूप प्रेम केलं. कार्यकर्त्यांवर कसं प्रेम केलं जातं, हे अजितदादांकडून शिकलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

मोदींच्या हुकूमशाहीचा देशातील नेत्यांकडून निषेध; सीबीआय, ईडीचा गैरवापर होत असल्याचा पत्राद्वारे आरोप

अंधभक्तांचे विश्वगुरू गप्प का ? संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल

शिंदेंना फक्त कागदावरच नाव आणि चिन्ह मिळालं; संजय राऊत यांचा टोला

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी