28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरराजकीय'पाठीमागे उभे राहून माझ्या अंगावरून हात फिरवला', शिवसेना महिला पदाधिकाऱ्याची 'या' नेत्याविरोधात...

‘पाठीमागे उभे राहून माझ्या अंगावरून हात फिरवला’, शिवसेना महिला पदाधिकाऱ्याची ‘या’ नेत्याविरोधात तक्रार

टीम लय भारी

इंदापूर : इंदापूर येथील शिवसेना महिला आघाडीतील पदाधिकाऱ्याने आपल्याच पक्षातील नेत्याविरोधात विनयभंगाची तक्रार केल्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल शिवराम बोंद्रे यांच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सुद्धा या गुन्ह्यांची नोंद केली आहे. बिघडलेल्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेना सध्या चर्चेचा विषय ठरत असली तरीही शिवसेना नेत्याच्या अशा या वागणुकीने शिवसेनेला तोंडघशी पाडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेने रीतसर तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार ही घटना 14 जुलै रोजी घडली असून इंदापूर येथील पक्ष कार्यालयामध्ये बैठक संपल्यानंतर फोटो काढत असताना शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल शिवराम बोंद्रे (रा.इंदापूर) यांनी पाठीमागे उभे राहून डाव्या खांद्यावर हात टाकत, माझ्या अंगावरून हात फिरवला आणि लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत विनयभंग केला, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या तक्रारीची दखल घेत या प्रकरणी अधिक तपास करीत पोलिसांनी विशाल शिवराम बोंद्रे यांच्यावर कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पक्षातील महिलेने थेट विनयभंगाचा आरोप लावल्यामुळे बोंद्रे आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांनी सदर आरोपच फेटाळून लावत गेली 35 वर्ष मी समाजकारण करत आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीतून सदर कृत्य करण्यात आलं आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा यापुढे कोणावरही अशी वेळ येऊ शकते. हा सर्व प्रकार पक्षासाठी घातक आहे,’ असे म्हणत यावर स्पष्टीकरण दिले आहे.

हे सुद्धा वाचा…

शिवसेनेला धक्का! मोदी सरकारकडून आदित्य ठाकरेंवर कारवाई?

‘राजा वही बनेगा जो हकदार होगा’, संदीप देशपांडे यांच्याकडून सूचक ट्वीट

नवनिर्वाचित राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!