27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयदहीहंडीत फुगड्या घालून चार्ज झालेले सोमय्या पुन्हा मैदानात!

दहीहंडीत फुगड्या घालून चार्ज झालेले सोमय्या पुन्हा मैदानात!

वादग्रस्त चित्रफितीमुळे गेली अनेक दिवस प्रसार माध्यमांपासून तोंड लपवून राहणारे भाजपचे क्रांतिकारी नेते तसेच माजी खासदार किरीट सोमय्या घाटकोपर येथील भाजपा आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात स्टेजवर दिसले. एवढेच नव्हे तर तिथे उपस्थित महिला कार्यकर्त्याबरोबर ते फुगडी खेळले. या फुगडी खेळानंतर हेच किरीटभाऊ चार्ज झाल्याचे पहायला मिळाले. याच सोमय्या यांनी खूप दिवसांनी ट्विटवर  पोस्ट केली आहे, तीही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्याबाबत.

‘जोगेश्वरी येथील रवींद्र वायकर यांचे ₹500 कोटीचे, बेकायदेशीर पंचतारांकित हॉटेल पाडण्याचा BMC मुंबई महापालिकाचा निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता दिली. उच्च न्यायालयाने वायकरची याचिका फेटाळली. 2021 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेकायदेशीर परवानगी दिली होती.’ असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. विधी  मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात किरीट सोमय्या यांची वादग्रस्त चित्रफित बाहेर आली.

लोकशाही या वृत्त वाहिनीवर ती सगळ्यात आधी प्रसारित झाली. या चित्र फितीतील रेकॉर्डिंग विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पेन ड्राइवच्या माध्यमातून सभागृहाच्या पटलावर ठेवले. तब्बल आठ तासांचे चित्रीकरण यात असल्याचे दानवे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना  म्हटले होते.  त्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते मंडळी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी तोंड लपवत होते. सोमय्या यांनी या चित्रफितीचा इन्कार केला नाही. पण तेही प्रसार माध्यमांपासून महिनाभर लांब होते. पण दहीहंडी उत्सवात ‘फुगड्या’ घातल्याने सोमय्या पुन्हा चार्ज झाले असून ते आता विरोधकांवर तुटून पडणार हे वेगळ्या प्रकारे सांगण्यासाठी त्यांनी हे ट्विट केल्याचे बोलले जात आहे.

‘निर्णय वेगवान’, घेऊन ‘महाराष्ट्र गतिमान’ करण्याच्या वल्गना जाहिरातीतून करणाऱ्या राज्य सरकारबाबत राज्यातील जनतेचे मत फारसे अनुकूल नाही. आतापर्यंत आलेल्या पाच सर्वेक्षणात राज्य सरकारच्या कारभारबाबत जनता साशंक आहे. राज्यात बेरोजगारी वेगाने वाढत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालावर योग्य हमीभाव मिळत नाही. औद्योगीक क्षेत्रात आनंदीआनंद असेच वातावरण आहे. असे असताना भाजपला गेल्या काही वर्षात गेलेली पत पुन्हा मिळवायची आणायची आहे.
हे सुद्धा वाचा
आजी-आजोबांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय
3 फुटांच्या पुंगनूर गायी पाच किलो चारा खातात आणि देतात पाच लिटर दुध
नकाश अझीझच्या ढोल ताशाच्या गजरातील ‘मोरया’ गाण्यावर तुम्ही ही धराल ठेका

राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे भाजपला थेट विरोधकांना अंगावर घेता येत नाही. पण शांत बसल्यावर विरोध जास्त आक्रमक होत असल्याचे निदर्शनास आल्यावर भाजपाने सोमय्या यांनाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून शुद्ध केले आहे. त्यामुळेच की काय आमदार वायकर यांना टार्गेट करण्याची भूमिका सोमय्या यांनी घेतली आहे. येत्या काळात किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळीचे प्रकरणे काढणार असल्याचे संकेत मिळत आहे. अशावेळी विरोधकांच्या भात्यात किती बाण आहेत, हे पहावे लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी