30 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरराजकीयपक्षप्रमुखांना निवडून देण्यात 'ते' ४० वांडही; सुषमा अंधारे यांची बोचरी टीका

पक्षप्रमुखांना निवडून देण्यात ‘ते’ ४० वांडही; सुषमा अंधारे यांची बोचरी टीका

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तारूढ झालेले एकनाथ शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये राजकीय रणकंदन माजले आहे. महाविकास आघाडी सरकार हे बेकायदेशीर असल्याचे शिंदे सरकार म्हणत आहे, तर सध्याचे सत्तारूढ सरकार अनौरस असल्याचा दावा ठाकरे गट करीत आहे. शिवसेना या पक्षावरच नव्हे, तर चिन्हावरही शिंदे गटाकडून हक्क सांगण्यात आला आहे. त्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) कायदेशीर लढाई सुरु आहे. आता तर शिवसेना पक्षप्रमुख हे पदच बेकायदेशीर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे म्हणणे आहे. त्याला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपल्या नेहमीच्याच धारदार शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. आता जे ४० वांड तिकडे गेले आहेत त्यांचादेखील पक्षप्रमुखांना निवडून देण्यात सहभाग होता, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. (Sushma Andhare citicise opposition leaders )

हे सुद्धा वाचा

Sushma Andhare : सुषमा अंधारेंनी सांगितले कधी कोसळणार शिंदे-फडणवीस सरकार!

Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

Sushma Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणतात राज साहेब म्हणजे कोण?

 

सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. राज्याच्या विविध भागांत त्यांच्या सभा होत आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पुढे सांगितले की, या महायात्रेचा समारोप मुंबईमध्ये होणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षातील अन्य नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुंबईत ठाकरे गटाच्या मोठ्या ८ सभा होणार आहेत. यावेळी त्यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे.

निवडणूक आयोग तुमच्या घरचे आहे का?

त्या म्हणाल्या, काहीजण सांगत आहेत की, शिवसेनेचे पक्षप्रमुख पद, पक्ष बेकायदेशीर असून आम्हालाच मान्यता मिळणार आहे. यावर त्यांनी संजय शिरसाटांवर खोचक प्रश्नांची सरबत्ती केली आहे. निवडणूक आयोगाने तुमच्या कानात येऊन हे सांगितले का? निवडणूक आयोग तुमच्या घरचे आहे का? तुम्ही इतक्या ठामपणे सांगत असाल तर मग तुमच्यात आणि आयोगात साटेलोटे आहे का? आणि जर तसे नसेल तर तुमच्यावर खटला दाखल करायचा का? अशा शब्दांत अंधारे यांनी संजय शिरसाट यांचा समाचार घेतला आहे.

लोकप्रतिनिधींच्या संख्याबळावर पक्षाची मान्यता ठरत नसते
पक्षाच्या मान्यतेबाबत विरोधकांना खडे बोल सुनावताना सुषमा अंधारे म्हणाल्या, कुठल्याही पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर पक्षाची मान्यता ठरत नसते. एखाद्या पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार त्यानुसार तो पक्ष प्रादेशिक आहे की राष्ट्रीय किंवा त्या पक्षाला कोणते चिन्ह द्यायचे हे ठरविण्यात येते. ही मतांची टक्केवारी शिवसेनेने यापूर्वीच सिद्ध केली असून शिंदे गटात गेलेल्या आमदारांचीही टक्केवारी आमचीच असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. शिंदे गटातील आमदार स्वतंत्र गट म्हणून कधीच निवडणुकांना सामोरे गेलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे मतांची टक्केवारी नाही. हा कायद्याचा पेच आहे, असे त्या म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी