37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईमहाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्यास तयार ; अजित पवारांनी सरकारी गाडी सोडली

महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्यास तयार ; अजित पवारांनी सरकारी गाडी सोडली

टीम लय भारी

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारी गाडी सोडली. आज ते स्वतःच्या गाडीने बाहेर पडले. त्यांनी सरकारी सुरक्षा देखील मागे ठेवली. त्यामुळे लवकरच नवे सरकार स्थापन होऊ शकते, असे संकेत निर्माण झाले आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकानंतर निर्माण झालेल्या या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी भाष्य करण्याचे टाळले. संजय राउतांनी महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्यास तयार आहे.बंडखोर शिवसैनिकांनी चोवीस तासात परत यावे असे आव्हान केले. त्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला.

बंडखोर शिवसैनिकांना भाजप शिवसेना युती हवी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्यांना राहायचे नाही. काँग्रेसमुळे ते नाराज आहे. काँग्रेसबरोबर हात मिळवणी करणे हे बाळासाहेबांच्या तत्वांमध्ये बसत नाही. त्यामुळे बंडखोरांच्या गटात नाराजी आहे. मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या तत्वांशी तडजोड केली. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या भावना दुखवल्या गेल्या.

संजय राऊत वक्तव्याला‘एक इशारा काफी है‘असे समजून दादांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा : शिवसेनेतील बंडखोरी ही मराठी माणसांना संपवण्यासाठी ; भाजपचे मोठे कपट कारस्थान

‘वर्षां‘नी दार उघडले; आता ‘बडव्यांचे‘ काय?

शिवसेना ‘महाविकास आघाडी’तून बाहेर पडण्यास तयार, पण बंडखोर आमदारांनी मुंबईत यावे : संजय राऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी