29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजन'टेलिग्राम'वर बंदी घाला, मराठी चित्रपट दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची मागणी

‘टेलिग्राम’वर बंदी घाला, मराठी चित्रपट दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची मागणी

टेलिग्राम या मेसेंजर अॅपवरुन एका चॅनलव्दारे एमपीएससीच्या ९० हजारांहून अधिक परिक्षार्थींचा टेटा लिक झाला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून एमपीएससी, राज्यसरकारवर कडाडून टीका होत आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्मान झाले आहे. अशातच मराठी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी देखील टेलिग्रामवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

टेलिग्रामवर अनेक फिल्म, वेबसीरिज लिक होतात, असे अनेक चॅनेल टेलिग्रामवर आहेत. चित्रपट निर्मिती हा तसा मोठा आर्थिक आव्हानाचा व्यावसाय असतो. प्रचंड कष्ट घेऊन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार चित्रपटांची निर्मिती करत असतात. त्यात मराठी चित्रपटांना तर चित्रपटगृह मिळण्यापासून लढा द्यावा लागत आहे. त्यातच चित्रपट लीक होण्यामुळे मोठा आर्थिक फटका मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिकांना होत आहे. टेलिग्रामवर अनेक चॅनल असून त्यावर चित्रपट लीक होतात. प्रेक्षकांना फुकटात नवाकोरा चित्रपट पहायला मिळतो, त्यामुळे अनेकज टेलिग्रामवरुन चित्रपट डाऊनलोड करुन पाहतात.

आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा डेटा लिक झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली असून हेमंत ढोमे यांनी देखील एक ट्विट करुन टेलिग्रामवर बंदीची मागणी केली आहे. ढोमे यांनी म्हटले आहे की, आता टेलिग्रामला MPSC चे हॉल तिकीट्स लीक झाले आहेत. ९० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा डेटा लीक झालाय. आमचा तर प्रत्येक सिनेमा लीक होतो आणि दुसऱ्या दिवशी तिथे येतो! टेलिग्रामवर सरकारने बंदी आणायला हवी! कुठलीच बंधनं नसलेलं हे ॲप सगळ्यांसाठी धोकादायक आहे!

हे सुद्धा वाचा

IPL 2023: अर्शदीपची ‘स्टॅम्पतोड’ बॉलिंग करतेय लाखोंचे नुकसान!

अमोल कोल्हे यांच्या ‘वाचाल तर वाचाल’मुळे सर्वांनाच टाकले बुचकुळ्यात

MPSC करिअरचे राजकारण; 90 हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक?

 

टेलिग्रामला कोणतेही बंधन नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अशा अॅप्सना सरकारने कडक नियमावली लागू करण्याची गरज आहे. शासनाचा महत्त्वाचा डेटा लिक होणे हे अतिशय गंभीर प्रकरण तर आहेच. मात्र चित्रपट उद्योगासारख्या अत्यंत आव्हानात्मक क्षेत्राला देखील टेलीग्राममुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. टेलीग्रामवर असंख्य चॅनलवरुन चित्रपट, वेबसिरीज लिक होतात. त्यामुळे टेलिग्रावर कडक निर्बंध घालण्याची ढोमे यांनी मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी