29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeशिक्षणमुंबईत 2 मार्चपासून शाळा पूर्ण क्षमतेनं होणार सुरू

मुंबईत 2 मार्चपासून शाळा पूर्ण क्षमतेनं होणार सुरू

टीम लय भारी

मुंबई: संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झालेला पाहायला  मिळतोय. त्यात पालिकेने महाविद्यालय व शाळांबाबत निर्णय घ्यायला सुुरवात देखील झाली आहे. त्यात आता पालिका विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेत मुंबईतील सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.(Mumbai Schools will start full capacity from March 2)

2 मार्चपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व  शाळा पूर्वरत सुरू होणार आहेत. कोविड-19 पूर्वी जसे वेळापत्रक होते त्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू होतील, असे परिपत्रक बीएमसीकडून जारी करण्यात आले आहे.

परिपत्रकात पालिकेने म्हंटले आहे की, सर्व बोर्डच्या सर्व माध्यमाच्या नगरबाहय विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात याव्यात.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील शाळा 27 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार?

सीबीएसई बोर्डाचा १० वी १२ वी परीक्षेसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय!

शिक्षण मंडळाचा निर्णय, 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार

Schools in Mumbai to return to 100% offline from next month, tweets Aaditya Thackeray

यासोबतच विद्यार्थ्यांना शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल, परंतु मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल. तसेच पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांना मधली सुट्टी असायची तशी मधली सुट्टी देखील असेल, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेता येईल. आणि या बरोबरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती आवश्यक असणार आहे.

अशा प्रकारे तपासणी होणार…

विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासले जाईल. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गाच्या सामामध्ये मैदानी खेळ शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत. एकंदरीत पूर्वरत असलेल्या शालेय वेळापत्रकानुसार हे सर्व सुरू राहील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी