28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजराज्यपालांच्या हस्ते या उद्योजकांना 'प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार प्रदान

राज्यपालांच्या हस्ते या उद्योजकांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार प्रदान

टीम लय भारी

मुंबई : जगातील अव्वल व्यापारी राष्ट्र होण्यासाठी उद्योग जगताने कृती आराखडा तयार करावा असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटले आहे(Governor awarded the ‘Pride of Maharashtra’ to entrepreneurs).

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना देशातील उद्योग जगताने पुढील २५ वर्षात देशाला जगातील अव्वल व्यापारी राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करावे व त्या दृष्टीने कृती आराखडा तयार करावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केले.

एसएमई चेंबर ऑफ इंडीया आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारे ‘इंडीया एसएमई एक्सलन्स पुरस्कार’ तसेच ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी रोजी राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

Governor awarded the 'Pride of Maharashtra' to entrepreneurs
एसएमई चेंबर ऑफ इंडीया आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनच्या वतीने हा पुरस्कार आयोजित करण्यात आला होता

देशाला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी तसेच निर्यातीसाठी ३ ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी उद्योग, लघु उद्योग, बँका तसेच वित्तीय संस्थांना महत्वाची भूमिका बजवावयाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

गोंयकारांसाठी राष्ट्रवादीचा खास असा गोवा विकास प्लॅन!

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा

लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विसर्जन

Socialist Dhruv Sayani receives award from Bhagat Singh Koshyari at Maharashtra Gaurav Awards

कार्यक्रमाला त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ डी. वाय. पाटील व एसएमई चेंबर आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे देखील उपस्थित होते.

Governor awarded the 'Pride of Maharashtra' to entrepreneurs
देशाला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी लघु उद्योग, बँका तसेच वित्तीय संस्थांना महत्वाची भूमिका बजवावयाची आहे

करोना काळात मुंबईकरांना महापालिकेच्या वतीने उत्तम आरोग्य सुविधा दिल्याबद्दल मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर यांना ‘प्राईड ऑफ मुंबई’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भूमी वर्ल्डचे संचालक प्रकाश पटेल, ठाकुर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचे जितेंद्र सिंह, बडवे इंजिनीअरिंग ग्रुपच्या संचालिका सुप्रिया बडवे, सूर्यदत्त शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ संजय चोरडिया, सर्वोत्तम इंडस्ट्रियल पार्कसाठी अनुप कुमार भार्गव व महिला उद्योजिका उत्कर्ष संग्राम पाटील आदींना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देण्यात आले.

टाटा टेली बिझनेसचे मुख्याधिकारी हरजीत सिंह, पियुष गुप्ता, अलसाल्ड्रो गिलीआनी, वर्धन तन्जोर राघवचारी, उदय अधिकारी, अर्पण मेहता, दिवीज तनेजा, एम फणीराज किरण, आनंद भंडारी, गौरव दुबे, सैयद अहमद, समीर चाबुकस्वार व अनुपम जोशी यांना राज्यपालांच्या हस्ते ‘इंडिया एसएमई एक्सलन्स’ पुरस्कार देण्यात आले.

Governor awarded the 'Pride of Maharashtra' to entrepreneurs
कार्यक्रमाला त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ डी. वाय. पाटील व एसएमई चेंबर आणि महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे देखील उपस्थित होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी