31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजकोरोनाला थोपवण्यासाठी मोठे पाऊल, IMA च्या महाराष्ट्र शाखेकडून टास्क फोर्सची स्थापना, उपचार...

कोरोनाला थोपवण्यासाठी मोठे पाऊल, IMA च्या महाराष्ट्र शाखेकडून टास्क फोर्सची स्थापना, उपचार पद्धतीविषयी माहिती देणार

टीम लय भारी

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन ते चार दिवसांनी दुप्पट होत आहे. वाढती रुग्णसंख्या म्हणजे कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचे संकेत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. तसेच विलगीकरणाचा कालावधीही कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. या पार्श्वभूमीवर कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आयएमएने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे(IMA Maharashtra Branch have Established Task Force).

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सद्वारे कोरोना बाधितांवरील उपचार तसेच औषधी याविषयीची माहिती देण्यात येणार आहे.

नो व्हॅक्सिन, नो एंट्री; अजित पवारांचा सूचक इशारा

३० पेक्षा अधिक खाटा असलेल्या रुग्णालयांत प्राणवायू टाक्या बंधनकारक

उपचार कसे करावे, काय काळजी घ्यावी याची माहिती देणार

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्समधील सदस्यांकडून कोरोनावरील उपचार पद्धती, त्यासाठीची औषधी आदी माहिती डॉक्टरांना देण्यात येईल. या टास्क फोर्समध्ये राज्यातील नामवंत डॉक्टर तसेच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. घरात विलगीकरणातील रुग्णांनी नेमके काय करावे ? त्यांनी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याच्या कुटुंबातील, सोसायटीतील आणि आजूबाजूच्या लोकांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शनही टास्क फोर्स करणार आहे.

“पुन्हा लॉकडाऊन” टप्पा जवळ येत आहे

Pune News Live: Pune district records 2,813 new Covid cases, 1 death

टास्क फोर्समध्ये कोणाचा समावेश

या टास्क फोर्समध्ये डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. अर्चना पाटे, डॉ. अनिला मॅथिव्ह, डॉ. भाविन झंकारिया, डॉ. संजय मानकर, डॉ. भक्ती सारंगी, डॉ. अविनाथ फडके, डॉ. सुप्रिया अमेय, डॉ. अरुणा पुजारी, डॉ. संगीता चेक्कर, डॉ. शशांक जोशी, डॉ. हर्षद लिमये तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी