28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजBig Breaking: पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

Big Breaking: पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक

टीम लय भारी

 पुणे : राज्य सरकारच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात (Maharashtra Government examination paper leak case) मोठी बातमी समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक (Tukaram Supe arrest) करण्यात आली आहे(MHADA: Tukaram Supe arrested in Paperfooty case)

पुणे पोलिसांच्या सायबर सेलने (Pune Police Cyber Cell) तुकाराम सुपे यांना गुरुवारी (16 डिसेंबर) चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यांनतर तुकाराम सुपे यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे.

MHADA Paper Leak | घरातली वस्तू कधी मिळणार, म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी आरोपींचा होता हा कोडवर्ड

MHADA परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकारणाच्या संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक केली आहे अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे टीईटीचे 50 ओळखपत्र आढळून आले आहेत. याच्याकडे टीईटीच्या ते चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली आहेत. टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी झाली होती.

MHADA Recruitment 2021 : लिपिक, अभियंतासह इतर ५३५ पदांसाठी भरती, १४ ऑक्टोबर अर्जाची शेवटची तारीख

MHADA lottery: Date for submitting documents extended till December 10

टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर tet च्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली नाहीये.

आता प्रितीश देशमुख याच्या घरी टीईटीची 50 ओळखपत्रे सापडल्याने टीईटी परीक्षेतही घोटाळा झाला का? असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा पपिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी