32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजभारतीयांना लागलं प्लास्टिक सर्जरीचं वेड! काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या

भारतीयांना लागलं प्लास्टिक सर्जरीचं वेड! काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या

टीम लय भारी

नवी दिल्ली: या जगात सगळ्यांनाच सुंदर दिसायच असतं. सुंदर दिसण्यासाठीचे सर्वाचे विचार देखील वेगवेगळे आहेत. सुंदर दिसण्याच्या ध्यासामुळे आता  जगभरात प्लास्टिक सर्जरीचं वेड लागल आहे. एका सर्वेक्षणात ब्राझील आणि अमेरिका प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी सर्वात अग्रेसर आहे. भारतातही प्लास्टिक सर्जरी करण्याचं वेड आता वाढू लागलं आहे(Plastic surgery: Indians go crazy with it )

आपण पाहिलं तर अनेक बॉलिवूड सेलिब्रेंटींनी प्लास्टिक सर्जरी केली आहे.  नेमकी ही प्लास्टिक सर्जरी काय असते? किती प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी केल्या जातात? आतापर्यंत भारतात  कोणत्या कलाकारांनी आपली प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुंदर दिसण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्लास्टिक सर्जरीसाठी नेमके किती पैसे लागतात?

मोदी सरकारने महाराष्ट्राबद्दलच्या प्रयत्नातून आणखी एक संस्था दिल्लीला हलवली !: सचिन सांवत

भेटवस्तूंवर टॅक्स लागतो? जाणून घ्या काय सांगतो कायदा

जगभरात प्लास्टिक सर्जरी करण्यात सर्वात अग्रेसर देश आहे तो म्हणजे ब्राझील आणि त्यानंतर अमेरिका. ब्राझीलमध्ये २०१९मध्ये १४,९३,६७३ प्लास्टिक सर्जरी झाल्यात तर अमेरिकेत २०१९मध्ये १३ लाख ५१ हजार ९७१ प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या आहेत.

भारताचा विचार केला तर भारतात २०१९मध्ये  ३ लाख ९४ हजार ७२८ प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्यात..  जगभरात प्लास्टिक करण्यात भारताचा शेअर हा ३.५ टक्के इतका आहे.

औषधे दूध आणि ज्यूससोबत का घेऊ नयेत? औषधाच्या पानावर का असते लाल रेघ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Youniq plastic surgery hospital inaugurated in Hyderabad

प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय?

प्लास्टिक सर्जरी म्हणजे शरीराचा कोणताही अवयव ठिक करणं. प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिक हा एक ग्रीक शब्द आहे. ज्याचा ग्रीक भाषेतील अर्थ बनवणे किंवा तयार करणे.

प्लास्टिक सर्जरीचे दोन प्रकार

  • कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic surgery)

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, कॉस्मेटिक सर्जरी या सुंदर दिसण्यासाठी केली जाते. यात स्तनांचे आकार कमी करणे,  पोट कमी करणे, नाकाला नवीन आकार देणे, नको असलेले केस काढून टाकणे, ओठांना चांगला आकार देणे इत्यादी सर्जरी केल्या जातात. एकंदरीत शरीरातील कोणताही भागाला पुन्हा आकार देण्यासाठी ही सर्जरी केली जाते.

  • रिकस्ट्रक्टिव्ह सर्जरी (Reconstructive surgery)

रिकस्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये शरीरातील कोणत्याही भागात एकादी खूण असेल किंवा मार्क असेल तर तो ठिक करण्यासाठी केली जाते. भाजलेली त्वचा ठिक करणे, एखादी खूण घालवण्यासाठी तसेच बऱ्याच जणांना बर्थमार्क म्हणजेच जन्मखूण असते  ती घालवण्यासाठी ही सर्जरी केली जाते.

प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी किती पैसे लागतात?

चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी  सुमारे  अडीच ते तीन लाख रुपये लागतात. नाकाच्या प्लास्टिक सर्जरीला राइनोप्लास्टी सर्जरी देखील म्हणतात. यात नाकाची रुपरेषा बदलली जाते. या सर्जरीला जवळपास ४० हजार ते २ लाखांपर्यंत खर्च येतो.

प्लास्टिक सर्जरी केल्याचे दुष्परिणाम काय?

  • जर चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली असेल तर खाली वाकून तुम्हाला कोणतेही काम करता येत नाही. कोणतेही जड वजन उचलता येत नाही त्यामुळे चेहऱ्याची त्वचा खेचली जाऊ शकते.
  • बऱ्याचदा अशा प्रकारच्या सर्जरीनंतर अतिरिक्त रक्तस्राव होण्याची शक्यता असते.
  • बऱ्याच जणांना सर्जरीनंतर इनफेक्शनचा सामना करावा लागतो.
  • नाकाची सर्जरी केल्यानंतर अनेकांनी त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचे सांगितले आहे.
  • तसेच नाकाच्या सर्जरीनंतर किंवा इतर कोणत्याही सर्जरीनंतर नाक किंवा चेहरा सुजतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी