33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeटॉप न्यूजरोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपातील काढली हवा

रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपातील काढली हवा

टीम लय भारी

मुंबई : पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. परंतु फडणवीस यांच्या आरोपातील हवा काढून घेणारी आकडेवारी आमदार रोहित पवार यांनी जाहीर केली आहे ( Rohit Pawar reacted on Devendra Fadnavis’ allegation).

देवेंद्र फडणवीस म्हणतात की, उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी २५ हजार व ५० हजार रुपयांची प्रती हेक्टरी नुकसान भरपाईची मागणी केली होती. फळबागांसाठी ठाकरे यांनी १ लाखापर्यंतची मागणी केली होती. ही मदत द्यायची नाही म्हणून ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलत आहे.

फडणवीस यांनी पुढे असेही म्हटले आहे की, ठाकरे सरकारने जाहीर केलेली मदत ही नियमित अर्थसंकल्पातीलच आहे. पण पॅकेजची मलमपट्टी लावून ती मदत असल्याचे भासवले जात आहे. किमान शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी मुख्यमंत्री धुळफेक करतील असे वाटले नव्हते, असा चिमटा फडणवीस यांनी ठाकरे यांना काढला आहे ( Devendra Fadnavis jibed on Uddhav Thackeray ).

हे सुद्धा वाचा

NCP : नाथाभाऊ काय चीज आहे ते आता दाखवून देऊ : शरद पवार

खरे व्हिलन कोण ? खडसे की, फडणवीस ??

अजितदादा कॉरन्टाईन, पण कामाचा धडाका सुरूच

फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर आमदार रोहित पवार यांनीही वेगळी आकडेवारी मांडली आहे ( Rohit Pawar shows BJP government’s failure in last tenure ).

पवार म्हणतात की, मागील भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना ५३ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यात केंद्राचे ११ हजार कोटी होते. राज्य सरकारने ४२ हजार कोटी दिले.

महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या माध्यमातून अगोदरच ३० हजार ८०० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. आता ५ हजार ५०० कोटी रुपये दिले आहेत. सत्तेवर आल्यानंतर एका वर्षाच्या आतच महाविकास आघाडी सरकारने एकूण ३६ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले असल्याकडे आमदार पवार यांनी लक्ष वेधले आहे.

गेल्या सरकारने जेवढी मदत केली त्याच्या ६७ टक्के मदत महाविकास आघाडी सरकारने अवघ्या एका वर्षात केली आहे. हे शेतकऱ्यांविषयीचे प्रेम आहे. उगीच शेतकऱ्यांविषयीचे बेगडी प्रेम ‘महाविकास आगाडी सरकार’ दाखवत नाही, असा टोलाही पवार यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी