35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईमहापौरांची मोठी घोषणा; आता 'यांना' मास्कची सक्ती नाही

महापौरांची मोठी घोषणा; आता ‘यांना’ मास्कची सक्ती नाही

टीम लय भारी

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून मास्क वसूली प्रकरण सुरू आहे. बरेच जण या विरोधात आपले मत मांडत आहे. त्यामुळे आता मास्क कोण वापरणार व कोणाला मास्क वापरण्याची सक्ती हे स्पष्ट झाले आहे(Mayor’s big announcement; Partially mask compulsion is removed).

क्लीनअप मार्शलमार्फत नागरिकांकडून सुरू असलेल्या ‘वसुली’ प्रकरणी गंभीर दखल घेतली गेली आहे. याप्रकरणी लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

महापौर असही म्हणाल्या, खासगी गाडीतून प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांना मास्क हे सक्तीचे नाहीत, त्यामुळे अशा प्रवाशांवर कारवाई करू नये, असे निर्देश त्यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई- बेलापूर वॉटर टॅक्सी आणि बेलापूर जेटी चे उद्घाटन

संजय राऊताच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन : अजित पवार

Mumbai mayor Kishori Pednekar hints at unlocking city by February-end as COVID cases dip

मात्र विनामास्क फिरणाऱ्या रहदारी नागरिकांना २०० रुपये दंड आकारण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र, क्लीनअप मार्शलमार्फत ठिकठिकाणी नागरिकांकडून विनापावती ‘चिरीमिरी’ घेतली जाते. तसेच पाणी पिण्यासाठी मास्क खाली घेतला असल्यासही दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. याबाबतचे १६ फेब्रुवारीच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते , त्यानंतर आता यासंदर्भातील गंभीर दखल सुद्धा महापौरांनी घेतली आहे.

तसेच विनापावती ‘वसुली’ करणाऱ्या, तसेच नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या मार्शलच्या विरोधात पालिकेने दिलेल्या १८००२२१९१६ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी